आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने पैशाचा वापर करून माझी प्रतिमा बिघडवली: राहुल गांधी यांचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- गुजरातमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पैसा आणि मनुष्यबळाचा वापर करून माझी प्रतिमा ‘बिघडवली’, असा आरोप काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी केला.


गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार मंगळवारी संपला. तेथे गुरुवारी मतदान होत आहे. त्याआधी गुजराती वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींत राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये काँग्रेसला विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. राहुल गांधी म्हणाले की, निकाल ‘जबरदस्त’ असतील. आम्हाला बहुमत तर मिळेलच, पण निकालामुळे तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. माझा सत्यावर विश्वास आणि मी सत्यच बोलतो.


तुम्ही प्रतिमा बदलली आहे का, या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, मी प्रतिमा बदलली नाही. माझी प्रतिमा बदलण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पैशांचा वापर केला. त्यासाठी प्रचंड पैसा खर्च करण्यात आला. निवडणूक प्रचारात अनेक मंदिरांत जाऊन दर्शन घेतल्याच्या प्रश्नावर राहुल म्हणाले की, मंदिरांत दर्शन घेण्यास बंदी आहे का? मंदिरात जायला मला आवडते म्हणून मी तेथे जातो.


दरम्यान, राहुल गांधी यांनी दिलेल्या मुलाखतींची भजापने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. चौकशी केल्यानंतर आयोगाने राहुल गांधी यांच्या मुलाखती प्रसारित करणाऱ्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आगेश दिले आहे.


रॉबर्ट वड्रांची भेट घेतली नाही - हार्दिक

काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांचे मेहुणे रॉबर्ट वड्रा यांची भेट घेतल्याचे वृत्त पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी बुधवारी फेटाळून लावले. हार्दिक पटेल यांनी रॉबर्ट वड्रा यांची गुप्त भेट घेतली होती, असा दावा हार्दिक यांचे माजी सहकारी दिनेश बांबानिया यांनी केला होता. हार्दिक पटेल हे पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या गाभा समितीच्या सदस्यांची दिशाभूल करत आहेत, असा आरोपही बांभानिया यांनी केला होता. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... गुजरात निवडणुकीचे निकाल पाहून तर भाजपलाही बसेल धक्का...

बातम्या आणखी आहेत...