आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिक पटेलच्या बहीणीच्या लग्नात खर्च झाले 10 कोटी रुपये, VIRAL झाले फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातमधील विधानसभा निवडणुकीचा धुराळा उडून आता खाली बसला आहे मात्र आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरुच आहेत. गुजरात मधील तरुण नेते आणि पाटीदार आंदोलनाचे प्रमुख हार्दिक पटेल यांच्यावर बहीणीच्या लग्नात वारेमाप खर्च केल्याचा आरोप झाला आहे. भाजप नेते रोहित चहल यांनी आरोप केला आहे की हार्दिक यांच्या बहीणीच्या लग्नात 10 कोटी रुपये खर्च झाले. त्यासोबतच मोनिका पटेलच्या ग्रँड वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

 

हार्दिक यांनी केला पलटवार 
- रोहित यांच्या आरोपानंतर हार्दिक पटेल म्हणाले, 'तुमच्याकडे इन्कम टॅक्स ऑफिस आहे, सीबीआय आहे, सर्व संस्थांना चौकशीचे आदेश द्या.'
- मीडिया रिपोर्ट्सनुसार हार्दिक पटेल यांची बहीण मोनिका यांना आरक्षणामुळे पी.एचडीला प्रवेश मिळाला नव्हता. त्यानंतर हार्दिक यांनी पाटीदारांना आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण गुजरातमध्ये आंदोलन उभे केले होते. 
- गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल हा तरुण चेहरा म्हणून समोर आला होता. पाटीदारांच्या आंदोलनामुळे गुजरातमध्ये मोठे राजकीय वादळ निर्माण झाले होते. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, लग्नाचे फोटो...