आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडोदा साहित्य संमेलन: सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सयाजीराव गायकवाड संमेलन नगरी, बडोदा- 91 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज, शुक्रवारपासून सुरु होत आहे. नवनिर्वाचित संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख अध्यक्षस्थानी राहातील.

 

दुपारी 4 वाजता संमेलनाचे उद्‍घाटन
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त डॉ. रघुवीर चौधरी यांच्या हस्ते दुपारी 4 वाजता संमेलनाचे औपचारिक उद्‍घाटन होणार आहे. महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची प्रमुख उपस्थिती राहील. संमेलनासाठी महाराष्‍ट्र सरकारने 1 कोटी निधी देण्याचा मुद्दा यावेळी उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. महाराष्‍ट्राचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे व महाराजा समरजितसिंह गायकवाड, डॉ. सीतांशू याश्चंद, डॉ.पी.डी. पाटील उपस्थित राहातील.

 

साहित्य महामंडळाचे ध्वजारोहण

साहित्य महामंडळाचे ध्वजारोहण सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्‍यात आले. यावेळी संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मावळते अध्यक्ष अक्षयकुमार काळे, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष श्रीपाद जोशी, संमेलनाचे कार्याध्यक्ष दिलीप खोपकर आदी उपस्थित होते.

 

महाराष्ट्र शासनातर्फे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्रग्रंथाच्या बारा खंडांचे प्रकाशनचेही प्रकारण चि.मेहता सभागृहात करण्यात आले. संमेलनाच्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या संमेलनात प्रथमच संमेलनाच्या अध्यक्षांच्या साहित्याचा स्टॉल ठेवण्यात आला आहे. या स्टॉलवर मान्यवरांनी पुस्तके चाळली.

 

गुजरात आणि बडोद्यातील 23 कवींचा प्रातिनिधिक संग्रह तसेच कवी विंदा करंदीकर यांच्यावरील कॅलेंडरचे प्रकाशन सिक्कीम चे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो..

बातम्या आणखी आहेत...