आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीने पतीकडे प्रेयसीची भेट घडवण्याचा धरला हट्ट; पतीने तिला दाखवल्यानंतर पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेहसाणा- पत्नीच्या हट्टापायी पतीने प्रेयसीबाबत केवळ माहितीच दिली नाही तर त्याने तिला ती दाखवलीही. मात्र, एवढ्यावर हे प्रकरण न थांबता पत्नी पतीवर चांगलीच संतापली. 


प्रेयसी दाखवणे पतीला एवढे महागात पडले की तिने त्याच्यापासून काडीमोड घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. पत्नी घटस्फोटासाठी अडून आहे तर पती तिला समजावण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. यादरम्यान वकिलांनी न्यायालय परिसरात तिला समजावण्याचा प्रयत्न केला. याचे फलित म्हणून तिचा राग शांत झाला व पतीसोबत राहण्यास तयारही झाली. 


मेहसाणातील हे दांपत्य आहे. या जोडप्यास एक मुलगी आहे. मेहसाणाचा रहिवासी या तरुणाचा विवाह सात वर्षांपूर्वी झाला आहे. पत्नीने वारंवार पतीच्या प्रेयसीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. पत्नी पतीकडे त्यासाठी हट्ट करत होती.अनेकदा हट्ट केल्यानंतर नुकत्याच एका समारंभात तिची भेट घडवून आणली. पतीच्या प्रेयसीला भेटल्यानंतर पत्नी पतीवर भडकली आणि तिने मेहसाणा न्यायालयात घटस्फोटाचे प्रकरण नेले. 

बातम्या आणखी आहेत...