आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नरोडा पाटिया दंगल: माजी मंत्री कोडनानी निर्दोष, बजरंगीची जन्मठेप कायमची शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरात हायकोर्टाने २००२ नरोडा पाटिया दंगल आरोपातून माजी मंत्री माया कोडनानी यांची निर्दोष मुक्तता केली. एसआयटीच्या कोर्टाने त्यांना २८ वर्षांची कैद शिक्षा सुनावली होती. हायकोर्टाने इतर १६ आरोपींचीही निर्दोष मुक्तता केली. बाबू बजरंगीसह १२ जणांची जन्मठेप कायम ठेवली. इतर दोघांच्या शिक्षेबाबत अद्याप निकाल दिलेला नाही. या सर्वांनी शिक्षेला हायकोर्टात आव्हान दिले होते. गोध्रा हत्याकांडानंतरच्या नरोडा पाटिया दंगलीत ९७ जण ठार झाले होते. घटनास्थळी कोडनानींची उपस्थिती सिद्ध करणारे पुरेसे पुरावे नसल्याचे हायकोर्टाने नमूद केले होते.

 

राज्यालाही फटकारले
कोर्टाने राज्य सरकारलाही फटकारले. दोषींच्या शिक्षेत आणखी वाढ करावी, अशी मागणी सरकारने केली. यावर कोर्ट म्हणाले, हा देखावा आहे. सरकारने दोषींच्या जामिनाला विरोध केला नाही. आता त्यांची शिक्षा वाढवावी, अशी विनंती करत आहे. 

 

माया कोडनानी यांना का निर्दोष सोडले? 
- कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटले, की घटनास्थळी माया कोडनानी उपस्थित असल्याचे पुरेसे पुरावे नाहीत. त्यामुळे त्यांना संशयाला लाभ दिला जात आहे. 
- जस्टिस हर्षा देवानी आणि जस्टिस ए.एस. सुपेहिया यांच्या खंडपीठाने सुनावणी पूर्ण करत गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये निर्णय राखून ठेवला होता. 

 

कोण आहे माया कोडनानी? 
- माया कोडनानी या 2007 मध्ये गुजरात मधील मोदी सरकारमध्ये महिला आणि बालविकोस मंत्री होत्या. त्यांच्यावर खटला सुरु झाल्यानंतर मार्च 2009 मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. 
- एसआयटीच्या विशेष कोर्टाने कोडनानी यांना 18 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यांना आयपीसी कलम 326 (धारदार शस्त्राद्वारे गंभीर इजा पोहोचवणे) नुसार 10 वर्षांची वेगळी शिक्षा सुनावली होती. अशा प्रकारे माया कोडनानीला एकूण 28 वर्षांची शिक्षा झाली होती. या प्रकरणी नंतर त्यांना जामीन मिळाला होता. 
- माया कोडनानी या डॉक्टर आहे. त्यांचे वडील हे राष्ट्रीय स्वयंसेवकर संघाशी संबंधीत होते. 1995 मध्ये मायाने अहमदाबाद महानगर पालिका निवडणुकीतून राजकारणात  पाऊल ठेवले होते. 1998 मध्ये त्या प्रथम आमदार झाल्या होत्या. 

 

विशेष कोर्टाने कोणाला दोषी ठरवले आणि कोणाला निर्दोष सोडले होते 

एकूण 62 आरोपी होते. त्यातील एकाचा सुनावणी दरम्यान मृत्यू झाला होता. 
दोषी : 32 
निर्दोष : 29 

दोषी/आरोपी विशेष कोर्टाचा निर्णय हायकोर्टाचा निर्णय 
माया कोडनानी 28 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा  पुराव्याआभावी सुटका 
बाबू बजरंगी अखेरच्या श्वासापर्यंत तुरुंगवास  शिक्षा कायम 

 

पीडितांची नुकसान भरपाईची याचिकाही रद्द 
- दंगल पीडितांनी हायकोर्टात नुकसान भरपाईसाठी याचिका दाखल केली होती, ती देखील हायकोर्टाने रद्द केली आहे. 

 

काय होते गोध्रा कांड? 
- 25 फेब्रुवारी 2002 रोजी आयोध्येतून मोठ्या संख्येने कारसेवक साबरमती एक्स्प्रेसने अहमदाबादला निघाले होते.
- 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्रामध्ये जमावाने रेल्वेच्या डब्याला आग लावली, यात 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता.
- 28 फेब्रुवारी 2002 रोजी विश्व हिंदू परिषदेने या घटनेविरोधात बंद पुकारला होता. या दरम्यान नरोडा पाटिया भागात जमावाने अल्पसंख्याक समाजावर हल्ला केला होता. अनेक घरे आगीच्या भक्षस्थानी दिली होती. त्यात 97 जणांचा मृत्यू झाला होता. 

 

अल्पसंख्याक समाजावर झाला होता हल्ला, 97 जणांची झाली होती हत्या 

- गुजरात दंगलीतील 9 प्रकरणांपैकी नरोडा पाटिया हे एक प्रकरण आहे. याचा तपास विशेष तपास पथकाने (एसआयटी) केली होती. 

 

7 वर्षांनंतर खटला सुरु झाला होता 
- गुजरातमध्ये 2002 मध्ये दंगल उसळली होती आणि नरोडा पाटिया दंगलीत 97 जणांची हत्या झाली होती. हा खटला तब्बल 7 वर्षांनी, अर्थात 2009 मध्ये दाखल झाला होता. यात 62 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
- सुनावणी दरम्यान आरोपी विजय शेट्टीचा मृत्यू झाला होता. 327 साक्षीदारांची या प्रकरणी साक्ष नोंदवण्यात आली होती. 

 

विशेष कोर्टाने काय निर्णय दिला होता? 
- नरोडा पाटिया दंगल प्रकरणी विशेष कोर्टाने गुजरातच्या माजी मंत्री माया कोडनानी आणि बंजरंग दलाचा नेता बाबू बजरंगीसह 32 आरोपींना दोषी ठरवले होते. तर, 29 जणांची निर्दोष मुक्तता केली होती. 
- दोषी ठरवण्यात आलेल्या 32 आरोपींनी त्यांना ठोठावलेल्या शिक्षेविरोधात गुजरात हायकोर्टात अपील केले होते. 

बातम्या आणखी आहेत...