आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक: दुस-या टप्‍यातील 93 जागांपैकी 52 भाजपकडे, काँग्रेसकडे 38, तर 15 जागी पाटीदार प्रभावी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात ९३ जागा अाहेत. त्यापैकी ५३ जागा उत्तर तर ४० जागा मध्य गुजरातमधील अाहेत. या मतदारसंघांत अाेबीसी, पाटीदार, राजपूत, अादिवासी मतदारांचा प्रभाव अाहे. ९३ पैकी ३३ जागी अाेबीसी व १५ जागी पाटीदारांचा प्रभाव अाहे. या टप्प्यात १४ जागा एसटी व ६ जागा एससीसाठी राखीव अाहेत.


२०१२ च्या निवडणुकीत भाजपला ९३ पैकी ५२ तर काँग्रेसला ३८ जागा मिळाल्या हाेत्या. दुसऱ्या टप्प्यात माेदींचे ‘हाेमटाऊन’ वडनगर मतदारसंघाचीही निवडणूक हाेत अाहे. या भागात मागील काही दिवसांपासून पाटीदार नेता हार्दिक पटेल व अाेबीसी नेता अल्पेश ठाकाेर यांच्या रॅली सुरू अाहेत. या दाेघांचाही काँग्रेसला पाठिंबा अाहे. उत्तर व मध्य गुजरातमध्ये ४०% अाेबीसी मतदार अाहेत.  या भागात २०% ठाकोर अाहेत.

 

> या टप्प्यांत ४०% ओबीसी मतदार, पंतप्रधान माेदी व माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांचा भाग

 

दाेन प्रमुख मुद्दे

- १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशात फक्त २ जागा मिळाल्या. यापैकी एक जागा मेहसानाची हाेती. ती याच भागात येते.
- २००२ च्या दंगलीनंतर भाजपने ‘मध्य’च्या ४१ पैकी ३७ जागा जिंकल्या.

 

अहमदाबादेत १६ जागा, १४ भाजपकडे, २ काँग्रेसकडे

या टप्प्यात अहमदाबाद जिल्हा चर्चित अाहे. इथे १६ जागांसाठी सुमारे ३९ लाख मतदार अाहेत.  २०१२ मध्ये भाजपने १४ तर काँग्रेसने २ जागा मिळवल्या हाेत्या. पाच जागांवर पाटीदार निर्णायक अाहेत. ४ जागा मुस्लिमबहुल अाहेत. येथीलच मणिनगर मतदारसंघातून नरेंद्र माेदी २००२ ते २०१४ या काळात अामदार राहिले हाेते.

 

> माेदींचा जिल्हा मेहसाणामध्ये ७ जागा.  पैकी ५ भाजपकडे.  पटेल मतदार २८ टक्के.

 

५४ ग्रामीण जागा, २३ भाजपकडे

- दुसऱ्या टप्प्यांत जिथे मतदान हाेत अाहे तिथे २००२ मध्ये ९५ जागा हाेत्या. पैकी ७३ जागी भाजपचा विजय. 
- २००७ च्या निवडणुकीत मध्य व उत्तर गुजरातमधील ९५ पैकी ५६ जागी भाजपला विजय मिळाला हाेता.
- दुसऱ्या टप्प्या ५४ जागा ग्रामीण अाहेत. २०१२ मध्ये यापैकी २३ जागा भाजपला मिळाल्या हाेत्या. काँग्रेस व मित्रपक्षांना तेव्हा ३१ जागी विजय मिळाला हाेता.  
- खेडा जिल्ह्यात अमूल सहकारी संस्थांमुळे परिसरातील २१ ग्रामीण जागांवर काँग्रेसचे वर्चस्व अाहे.

 

- २०१२ मध्ये केशुभाई पटेल यांच्यामुळे भाजपला उत्तर गुजरातमध्ये ११ जागांचा फटका बसला हातेा. पैकी ४ जागा तर भाजप २३०० मतांनी गमावल्या. काँग्रेसला या ठिकाणी भाजपपेक्षा फक्त २ % मते अधिक हाेती.
- माजी मुख्यमंत्री वाघेलांचा या भागातील सवर्ण, अादिवासींवर प्रभाव अाहे. त्यांचा जनविकल्प पक्ष सर्वच १८२ जागा लढवत अाहे. वाघेलांसाेबत १४ अामदारांनी काँग्रेसला साेडचिठ्ठी दिली अाहे. हा पक्ष कार्ग्रेसच्या व्हाेट बँकेला नुकसान पाेहाेचवू शकताे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, २०१२ मध्ये ९३ जागांचे गणित...

बातम्या आणखी आहेत...