आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतापजनक: पॉर्न अॅडिक्ट 22 वर्षीय मुलाचा 46 वर्षीय आईवर बलात्कार, गुजरातमधील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालनपूर- पॉर्न साईटच्या आहारी गेलेल्या एका 22 वर्षीय तरूणाने आपल्या जन्मदात्या आईवरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुजरातमधील पालनपूर जिल्ह्यात पाटण येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी या तरूणाच्या 46 वर्षीय आईने पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

 

याबाबतची संतापजनक माहिती अशी की, पाटण भागात संबंधित कुटुंब राहते. या कुटुंबात पती-पत्नी व दोन मुले व एका मुलगी राहते. यातील 22 वर्षीय धाकटा मुलगा राहुल यास पॉर्न पाहण्याची सवय होती. या सवयीतून तो पॉर्न अॅडिक्ट झाला होता. तो ऑफिसवरून घरी आला की आपल्या घरात तासनतास मोबाईलवर पोर्न क्लिप पाहत बसायचा. तो घरात आई-बहिण यांच्यासमोरही या क्लिप पाहायचा. याबाबत त्याला आईने खडसावलेही होते. मात्र, राहुलमध्ये सुधारणा होण्याची कोणतेही चिन्हे नव्हती. यातून एकदा त्याने आईला माझ्यासोबत शरीरिक संबंध ठेव अशी विचारणा केली होती. रात्री उशिरापर्यंत तो मोबाईलवर पॉर्न क्लिप पाहत बसायचा.

 

गुरूवारी रात्रीही नेहमीप्रमाणे राहुल मोबाईलवर पॉर्न क्लिप पाहत होता. रात्री एकच्या सुमारास पाणी पिण्याच्या निमित्ताने तो आईच्या रूममध्ये गेला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेने आईला प्रचंड मानसिक धक्का बसला.

 

यानंतर पीडित आईने तिच्या पतीला व थोरल्या मुलाला माहिती दिली. त्यानंतर मुलगा राहुलविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला. बलात्काराची तक्रार दाखल होताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून राहुलला अटक केली. याप्रकरणी पोलिस मुलगा राहुलची चौकशी करत आहेत. सोबत राहुल व त्याची पीडित आई यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.  

बातम्या आणखी आहेत...