आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअहमदाबाद- विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया (६२) मंगळवारी पत्रकार परिषदेत भावुक झाले. अश्रुपूर्ण डोळ्यांनी म्हणाले, ‘जुने खटले उकरून मला अडकवले जात आहे. सोमवारी राजस्थान पोलिसांचे पथक आले होते. माझ्या एन्काउंटरची शक्यता होती. मी घाबरत नाहीये, मात्र मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.’ ताेगडिया सोमवारी सकाळी अचानक बेपत्ता झाले होते. तब्बल १२ तासांनी ते बेशुद्धावस्थेत सापडले होते. पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘काही काळापासून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी देशभरात माझ्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. राम मंदिर, गोहत्या, काश्मीरच्या हिंदूंचे रक्षण हे मुद्दे मी आक्रमकपणे मांडत राहिलो. मात्र, माझ्यावर आयबीने दबाव आणला.’ पत्रकार परिषदेनंतर पाटीदार नेता हार्दिक पटेल व काँग्रेस नेते अर्जुन मोढवाडिया यांनीही तोगडियांची भेट घेतली.
पाणावलेल्या डोळ्यांनी सांगितला घटनाक्रम
सोमवारी एक व्यक्ती माझ्या खोलीत येऊन म्हणाली, तुमच्या एन्काउंटरसाठी काही लोक निघाले आहेत. राजस्थान पोलिस ताफा गुजरात पोलिसांसोबत निघाल्याचा फोन आला. मला वाटले, काही अघटित घडले तर माझे व्हायचे जे होईल, पण अवघ्या देशभरात वातावरण तंग होईल. एका कार्यकर्त्याला सोबत घेऊन ऑटोत बसलो. राजस्थानच्या मुख्यमंत्री व पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला. ते म्हणाले, आमचे पाेलिस पथक निघालेले नाही. फाेन स्विच ऑफ केला. एका व्यक्तीच्या घरून दुसऱ्या फोनने माहिती घेतली. तेथे माझ्याविरुद्ध एकही खटला नव्हता. जयपूर कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. ऑटोत भोवळ आली, घामाघूम झालो. रात्री १०-११ वाजता रुग्णालयात असल्याचे कळले.’
पत्रकार परिषदेत काय म्हणाले, विहिंपचे प्रवीण तोगडिया
> काही काळापासून माझा आवाज दाबण्याचा जोरदार प्रयत्न केला जात आहे.
> मी हिंदू ऐक्यासाठी लढत आहे.
> देशभरात माझ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जुने खटले काढून मला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
> मला अटक करून एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात पाठवण्याचे काम गुजरातमधून सुरू झाले.
> मकरसंक्रांतीच्या दिवशी राजस्थान पोलिसांचे पथक अजामीनपात्र वॉरंट घेऊन मला अटक करण्यासाठी आले.
> हा माझा आवाज दाबण्याचा प्रय्तन आहे. त्या परिस्थितीतही मी हिंदु संघटनेचे काम करत राहिली.
> मी मुंबईत एका कार्यक्रमातून एका कार्यक्रमातून रात्री 1 ते 1.30 दरम्यान पोहोचलो. पोलिसांनी मी रात्री 2.30 वाजता यायला सांगितले. सकाळी मी पुजा करत असताना एक व्यक्ती माझ्या घरात आला. त्याने सांगितले लगेचच इथून निघा तुमच्या एन्काऊंटरसाठी लोक निघाले आहेत.
> मी मृत्यूला घाबरत नाही. त्यामुळे मी त्याचे ऐकले नाही. बाहेर दोन पोलिस होते. तेवढ्यात मला एक फोन आला. त्यावर राजस्थान पोलिसांचा ताफा गुजरात पोलिसांच्या मदतीने येत असल्याचे मला कळले.
> मला वाटले काही झाले तर माझे जे व्हायचे ते होईल, पण देशभरातील वातावर चिघळेल. लगेच मी आता घातलेले कपडे घातले आणि पैशाचे पाकीट घेऊन निघालो. पोलिसांना सांगून मी सोबत काही कार्यकर्त्यांना घेऊन रिक्षामध्ये निघालो.
> रस्त्यात मी राजस्थानच्या गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना संपर्क केला त्यांनी कोणतेही पथक निघाले नसल्याचे सांगितले. मी त्यानंतर लगेच लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून सगळे फोन स्विच ऑफ केले.
> एका घरात जाऊन मी वकिलांना आणि तज्ज्ञांना संपर्क केले तेव्हा त्यांनी जयपूरमध्ये न्यायालयासमोर शरणागती पत्कारण्याचा सल्ला दिला.
> जयपूरला जाण्यासाठी मी रिक्षाने एअरपोर्टकडे निघालो, पण मला श्वास घेण्यास त्रास सुरू झाला त्यानंतर मी बेशुद्ध झालो, नंतर काय झाले मला काहीही कळले नाही.
> रात्री 12 च्या दरम्यान मी शुद्धीत आलो, तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये असल्याचे माझ्या लक्षात आले.
> मी गुन्हेगार नाही, पण माझ्या घराच्या, कार्यालयाच्या तपासणीचे प्रयत्न का केले जात आहेत.
हेही वाचा...
एकेकाळी घनिष्ठ मित्र होते मोदी अन् तोगडिया, अशी आली संबंधांत कटुता...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.