आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार पीडितेची ओळख लपवण्यासाठी 7 महिला कॉन्स्टेबलही चेहरा झाकून पोहचल्या कोर्टात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातमध्ये एका सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची ओळख लपवण्यासाठी पोलिसांनी एख अनोखा प्रयोग केला. मंगळवारी कोर्टात पीडितेचा जबाब नोंदवला जाणार होता. त्यासाठी क्राइम ब्रँच एसपी पन्ना मोमाया यांनी पीडितेबरोबर तिच्यासारखेच कपडे परिधान करून इतर 7 महिलांनाही कोर्टात पाठवले. महिला कॉन्सटेबलनेही महिलेप्रमाणए चेहरा रुमालाने झाकलेला होता. 


एसपी मोमाया म्हणाले की, सुप्रीम कोर्टाचे दिशानिर्देश आणि महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी असा प्रयोग प्रथमच करण्यात आला आहे. गरज पडली तर त्याचा पुढेही वापर सुरू ठेवला जाईल. पोलिसांच्या या पावलाचे चांगलेच कौतुक केले जात आहे. 


26 मार्च ला झाली होती घटना 
सॅटेलाइट परिसरात कारमधून आलेल्या आरोपींनी पीडितेचे अपहरण केले होते. सर्वांनी मंकी कॅप परिधान केल्या होत्या. गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध करण्यात आले आणि तिच्यावर कारमध्येच बलात्कार करण्यात आला. महिलेचा व्हिडिओ तयार करून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला रस्त्यात खेपण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...