आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक चुक झाली, कार उघडी ठेवली; दोन कुटुंबांतील एकुलत्या एक वारसांचा झाला होरपळून मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सूरत- शहरातील डिंडोलीच्या मानसी रेसिडेंसीमध्ये राहण्याऱ्या दोन कुटुंबांनी सोमवारी आपल्या एकुलत्या एक मुलांना गमवले. दुपारी 12 वाजेच्या दरम्यान दुकानात निघालेले दोन मुलं बाहेर उभी असलेल्या कारमध्ये बसले. मुलांनी कारमध्ये बसून दरवाजा बंद केला. त्यानंतर कारचा दरवाजा लॉक झाला. भर उन्हात अनेक तास कारमध्ये कोंडल्यामुळे दोघांचाही गुदमरून मृत्यू झाला.


असे आहे संपूर्ण प्रकरण....
दुपारी दीड वाजेपासून कुटुंबीयांनी आणि सोसायटीतील लोकांनी मुलांचा शोध घेण्यास सुरूवात केली. पोलीसांनादेखील सुचना देण्यात आली होती. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास कारच्या दिशेने कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आल्यानंतर कळाले की, दोघे कारमध्ये बंद आहेत. नातेवाईकांनी तात्काळ कारचे काच तोडून दोघांना बाहेर काढले आणि उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. परंतु, तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. घटनेत दोघांची कातडी पुर्णपणे होरपळून गेली होती.


मानसी रेसिडेंसीमधील 67 क्रमांकाच्या घरात राहणाऱ्या निखिले जरीवाला यांनी आपल्या 4 वर्षीय विराज आणि 62 क्रमांकाच्या घरात राहणाऱ्या महेश रुपवाला यांनी आपल्या 5 वर्षीय हेलीशला या घटनेत गमावले. विराज जूनियर केजीमध्ये, तर हेलीश सीनियर केजीमध्ये शिकत होते आणि 7 जुलैला त्याचा वाढदिवस होता.

 

लॉक असल्यामुळे कारमधील तापमाण 51 डिग्री पर्यंत पोहोचले...

डीसीपी राकेश बारोट यांनी सांगितले की, कार रविवारी सकाळी मानसी रेसिडेंसीमध्ये उभी होती. कदाचीत ही कार अनलॉक असावी असो त्यांनी सांगितले. मुलं खेळत-खेळत कारमध्ये बसले आणि कार आतून अनलॉक झाल्याने दोघांचा त्यात गुदमरून मृत्यू झाला. कारमध्ये वाढलेले तापमान आणि स्वास न घेता आल्याने मुलांनी दम तोडला. फिजिक्सचे अभ्यासक डॉ. पृथुल देसाई यांनी सांगितले की, बंद कारमधून उष्णता बाहेर जात नाही. उन्हात उभ्या असलेल्या कारमधील तापमान एका तासात 35.6 डिग्रीवरून 51 डिग्री पर्यंत पोहोचले असावे.

 

बातम्या आणखी आहेत...