आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिल्ली’च्या इशाऱ्यावरून कारवाई; प्रवीण तोगडिया यांचा केंद्र सरकारवर आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- विहिंप नेते प्रवीण तोगडिया  यांनी आपल्याविरुद्धची पोलिस कारवाई दिल्लीच्या इशाऱ्यावरूनच सुरू असल्याचा गंभीर आरोप बुधवारी केला. मंगळवारी बेशुद्धावस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. बुधवारी रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर त्यांनी थेट मोदी सरकारवर आरोप केला.

 
तोगडिया म्हणाले, ‘गुन्हे शाखा बनावट व्हिडिओ करून मला बदनाम करण्याचा कट करत आहेत.’ या पोलिसांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला.पोलिसांनी शोध सुरू केला,  तेव्हा तोगडिया बेपत्ता झाले होते. नंतर मंगळवारी ते बेशुद्धावस्थेत सापडले होते. 
भाजप नेते संजय जोशी यांची वादग्रस्त सीडी कुणी तयार केली हे माहीत असल्याचा दावा तोगडियांनी केला. त्यामुळे माझा बनावट व्हिडिओ तयार करून बदनाम करण्याचे षड््यंत्र आखले जात असल्याचे तोगडिया म्हणाले.

 

काय आहेत प्रवीण तोगडियांचे 4 पॉंइंट

1) क्राईम बँच रचत आहे कट
- तोगडिया म्हणाले, नकली व्हिडीओ बनवून मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे. मला गुजरातच्या पोलिसांवर गर्व आहे पण माझ्यावर डाग लागावा यासाठी क्राईम बँन्च आणि अहमदाबादचे पोलिस सहआयुक्त जे. के भट्ट काम करत आहेत. माझ्याविरोधात कट रचण्यात येत आहे. 

 

2) मी सांगेल की संजय जोशींची सीडी कोणी बनवली
- राजस्थान पोलिसांनी माझ्या विरोधातील केस रद्द केली आहे. संजय जोशींची सेक्स सीडी कोणी बनवली हे मला माहिती आहे. वेळ आल्यावर मी ते सांगेल. 

 

3) मोदी सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहे क्राईम ब्रॅंच
- जे. के. भट्ट यांचे इनकमिंग आणि आऊटगोईंग कॉल डिटेल्स सार्वजनिक करण्यात याव्यात. पंतप्रधानांसोबत त्यांची चर्चा झाली असल्यास तेही स्पष्ट करावे. जे. के. भट्ट हे दिल्लीतील राजकीय बॉसच्या इशाऱ्यावर कट रचत आहेत. देशभक्त कार्यकर्त्यांना त्रस्त करण्यात येत आहे. 

 

4) रात्री दोन वाजता क्राईम ब्रँचने मला उठवले होते
- तोगडिया म्हणाले, मी क्राईम बॅंचविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. क्राईम बॅंचने मला रात्री 2 वाजता उठवले होते. 

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...