आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वऱ्हाडींचा ट्रक पुलावरून कोसळला, 30 जण ठार; वराचे आई-वडील व बहिणीचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घटनास्थली पोहोचली रेस्क्यू टीम. आसपासच्या लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. - Divya Marathi
घटनास्थली पोहोचली रेस्क्यू टीम. आसपासच्या लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे.

भावनगर- गुजरातमधील भावनगर येथे मंगळवारी सकाळी वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाणारा ट्रक सकाळी पुलावरून खाली कोसळून ३० जण ठार झाले. या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये १० जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांत नवरदेवाचे आई-वडील, बहिणीसह बहुतांश महिला व लहान मुले आहेत. भावनगरहून रुग्णवाहिका घेऊन पाच पथके दाखल झाली. 


पालीताना आणि सिहोरजवळील रुग्णालयात जखमींना भरती करण्यात आले. घटनास्थळी जमलेल्या लोकांनी अपघातग्रस्तांना ट्रकमधून बाहेर काढण्यास मदत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करून अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले. अपघाताची माहिती देताना पोलिस अधीक्षक ए. एम. सय्यद यांनी सांगितले, हा अपघात राजकोट-भावनगर महामार्गावर झाला. ट्रकमध्ये ७० लोक प्रवास करत होते. पालीताना येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक गेंडिया नदीच्या पुलावरून खाली कोसळला. 


नदीच्या कोरड्या पात्रात ट्रक उपडा पडला हाेता. चार चाके वरच्या बाजूला होती. त्यामुळे लोक त्याखाली दबले गेले. ड्रायव्हरला डुलकी लागल्याने अपघात घडल्याचे सांगण्यात येते.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, अपघातानंतरचे काही PHOTOS

बातम्या आणखी आहेत...