आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG सरकार, कोर्टाने नव्हे या गावात देवानेच पत्राद्वारे दिली दोन मजली घरांची परवानगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाव (सूरत) - आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेले गुजरातमधील 10 हजार लोकसंख्येचे ढीमा नावाचे गाव आहे. या गावात एकही दुमजली घर नाही. पण अनेक पिढ्यांनंतर आता या गावात दुमजली घर बांधले जाणार आहे. दोन मजली घर बनवण्यासाठी सरकारने किंवा कोर्टाने नव्हे तर प्रत्यक्षात देवानेच मंजुरी दिली आहे. 


या गावातील लोक असे मानतात की, कोणीही देवापेक्षा मोठे नसेल तर, त्यांची घरे मंदिरापेक्षा मोठी कशी असू शकतात. याच मान्यतेमुळे गावातील देव धरणीधर (श्रीकृष्ण) च्या 31 फूट ऊंच मंदिरापेक्षा छोटे म्हणजे एक मजली घरच लोक तयार करत होते. 


परंपरा तोडली तर घडले अघटीत 
ग्रामस्थांनी यावर आस्थेच्या मार्गानेच तोडगा काढला. सर्वात आधी मंदिराची उंची वाढवली. आता ध्वजासह मंदिराची उंची झाली आहे, 71 फूट. त्यानंतर देवाला पत्र लिहून लेखी परवानगी घेण्यात आली. देवाने होकारार्थी पत्र पाठवल्यानंतर आथा गावात दुमजली घर बांधता येणार आहे. येथे राजपूत, ब्राह्मण, पटेल आणि दलित अशा विविध समाजांची 800 घरे आहेत. 

सरपंच हर्षा सेवक यांनी सांगितले की, ही केवळ आस्था नाही. कारण लोकांनी यापूर्वी काही लोकांनी दोनमजली घरे तयार केली, पण त्यांना काही तरी संकटाचा सामना करावा लागला. अखेर त्यांना घरे तोडावी लागील. पण आता देवाच्या परवानगीनंतर सर्व आनंदी आहेत. जन्माष्टमीला देवाला चांदीचे सिंहासन अर्पण केले जाणार आहे. 


पत्राद्वारे देवाचा होकार.. 
मंदिरांची उंची वाढवली तरी दुमजली घरासाठी देवाची परवानगी घेतली गेली. त्यासाठी मंदिराच्या 597 व्या पाटोत्सवात मोरपंखाद्वारे दोन पत्र लिहिण्यात आली. त्यापैकी एकावर लिहिले दुमजली घर बांधण्याची परवानगी आहे आणि दुसऱ्यावर लिहिले परवानगी नाही. त्यानंतर दोन्ही चिठ्ठ्यामधून लहान मुलाकडून एक चिठ्ठी उचलण्यात आली. मुलाने परवानगी आहे असे लिहिलेली चिठ्ठी उचलले. त्यानंतर दुमजली घरे बांधणे सुरू झाले. या गावात मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या केली होती, असे म्हटले जाते. त्यांची मूर्तीही येथे आहे. तसेच येथे सात मजली वाव विहिरही आहे.

 

बातम्या आणखी आहेत...