आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करोडपती बापाने 500 रुपये देत महिनाभरात नोकरी शोधायला सांगितले, मुलाने कमावले 5 हजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत-  सहा हजार कोटींहून जास्त संपत्तीचे मालक, हिरे व्यापारी घनश्यामभाई ढोलकिया यांनी स्वावलंबन, जबाबदारीची शिकवण मिळावी म्हणून २३ वर्षीय मुलगा हितार्थच्या हातावर ५०० रुपये टेकवत हैदराबादला पाठवले. व्यवसायाच्या अडचणी, सामान्यांच्या समस्या समजाव्यात हा उद्देश. नोकरी शोधताना वडिलांची ओळख सांगायची नाही, एके ठिकाणी एक आठवडाच काम करायचे ही अट घातली. त्यांनी हितार्थला मोबाइल व एटीएम कार्डही दिले नाही. हितार्थ ५ हजार रुपयांच्या बचतीसह घरी परतला आहे. 

मी महिनाभरात तीन कंपन्यांत नोकरी केली, एक आठवडा दुचाकीने मार्केटिंग व ऑर्डरचा पुरवठा केला
एके दिवशी पप्पांनी माझ्या हातावर लिफाफा ठेवला. त्यात हैदराबादचे तिकीट होते. तेथे पोहोचलो. मोबाइल नव्हता, त्यामुळे दुसऱ्याच्या फोनने पप्पांच्या सहायकाला कॉल केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पहिला दिवस नोकरी शोधण्यात गेला. रात्र कशी काढावी, ही चिंता होती. जवळ ओळखपत्रही नव्हते, त्यामुळे कोणी जागा देण्यास तयार नव्हते. अखेर आरके लॉजच्या मालकाने उधारीत राहू दिले. भूक लागली, पण पैसे कमी होते. त्यामुळे हॉटेलात २० रुपयांत राइस प्लेट घेतली. आयुष्यात पहिल्यांदाच एक प्लेट भात खाल्ला. दोन दिवस फिरल्यानंतर मॅकडोनाल्डमध्ये नोकरी मिळाली. तिथे मी प्रॉडक्शन, सेल्स व इन्व्हेंटरीत काम केले. आठवड्यानंतर नोकरी बदलायची होती. त्यामुळे २ दिवसांपासून वेतनासाठी मॅनेजरच्या मागे लागलो. त्यांनी १५०० रुपये दिले. दुसऱ्या नोकरीच्या शोधात बसमध्ये धक्काबुक्की सहन केली. व्हाइट बोर्ड तयार करणाऱ्या कारखान्यात काम मिळाले. मार्केटिंग करून ऑर्डर पुरवण्याचे काम होते. दिवसभर धावपळ केल्याने रात्री थकून जायचो. या २ दिवसांतच उमगले की, कष्टाला शाॅर्टकट नसतो. दरम्यान, ऑटोरिक्षात रुकगुप्त पराशार्थची ओळख झाली. त्यांनी ओळखीविनाच आश्रय दिला. तिसरी नोकरी अदिदासच्या शोरूममध्ये मिळाली. या वेळेस माझ्याकडे तीन पर्याय होते. या कामात सहकारी कर्मचाऱ्यांकडून बरेच शिकायला मिळाले.

शोरूममध्ये बूट दाखवताना हितार्थ  
वडील घनश्याम म्हणाले, कुटुंबाची ही परंपरा आहे. गेल्या वर्षी द्रव्य हा थोरला मुलगा गेला होता. तो ४ हजार कमावून आला. मूल्यशिक्षणासाठी आम्ही मुलांना बाहेर पाठवत असतो.
बातम्या आणखी आहेत...