आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

VIDEO : सासऱ्याने प्रियकरासोबत रंगेहात पकडले, सुनेने केली आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत मोहिनी आणि तिचा प्रियकर धर्मेश. - Divya Marathi
मृत मोहिनी आणि तिचा प्रियकर धर्मेश.
सूरत- शहरातील रुस्तमपुरा भागात एका विवाहीतेने मंगळवारी सकाळी फाशी घेऊन आत्महत्या केली. विवाहितेला तिच्या सासऱ्याने राहत्या घरात प्रियकरासोबत पकडले होते. यानंतर बदनामी होण्याच्या भितीने सुनेने फाशी घेऊन आत्महत्या केली. यानंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोद करून बॉडी पोस्टमॉर्टमनंतर घरच्यांच्या ताब्यात दिली आहे.
सासरा सुनेच्या प्रियकराला पकडण्यासाठी धावला...
रुस्तमपुरा भागातील पार्क एव्हेन्यू अपार्टमेंटमध्ये मनोजभाई (बदललेले नाव) पत्नी, चार वर्षांचा मुला आणि वडिलांसोबत राहतात मनोज साधारणपणे पाच वर्षांपूर्वी मानसी (बदललेले नाव) सोबत लग्न झाले होते. त्यांना चार वर्षांचा मुलगाही आहे. मंगळवारी सकाळी मुला शाळेत गेला होता. आणि मनोज ड्युटीवर गेला होता आणि वडिलही काही कामानिमित्त बाहेर गेले होते.
पलंगाच्या खाली लपला होता प्रियकर....
मनोजभाईचे वडील योगेशभाई (बदललेले नाव) यांनी सांगितल्यानुसार ते काही कामानिमित्त सरकारी अधिकाऱ्याला भेटण्यासाठी गेले होते. मात्र त्यांची भेट झाली नाही. यामुळे ते घरी लवकर पोहोचले. घरी पोहोचताच त्यांना मानसी व्यतिरिक्त आणखीही कुणीतरी घरात असल्याचा संशय आला. एवढेच नाही तर तिला दरवाजा उघडायलाही बराच उशीर झाला. यानंतर लगेचच मानसी तिच्या रूमकडे जायला लागली. तिच्या मागेमागेच योगेशभाईदेखील गेले आणि शोधाशोध करायला लागले. या दरम्यान त्यांना मानसीच्या रूममध्ये तिच्या पलंगाखाली एक मुलगा लपलेला दिसला. यानंतर योगेशभाई यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगा हात सोडून पळून गेला. योगेशभाईदेखील त्याचा पाठलाग करू लागले. थोड्यावेळानंतर जेव्हा ते घरी आले तर मानसीने घरातील तिच्याच रूममध्ये फाशी घेतलेली होती. यानंतर त्यांनी मुलाला आणि शेजारील लोकांना याची कल्पना दिली. तो मुलगा मानसीचा प्रियकर होता. यामुळे बदनामी होण्याच्या धाकाने मानसीने आत्महत्या केली.
पुढील स्लाइ्डसवर पाहा, संबंधित Photos....
बातम्या आणखी आहेत...