आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM मोदी यांच्या डिजिटल पेमेंट स्कीममध्ये सुरतच्या तरुणाला लागली लॉटरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत (गुजरात)- नोटबंदीनंतर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन डिजिटल पेमेंट इंन्सेटीव्ह स्कीम अंतर्गत येथील तरुणाला लॉटरी लागली आहे. त्याला 10 हजार रुपयांचे बक्षिस जाहीर झाले आहे. येथील एक खासगी शाळेत नोकरी करणाऱ्या या तरुणाने कार्ड वापरुन 195 रुपयांचे पेट्रोल भरले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्याला बक्षिस घोषित झाले आहे. यावर मात्र त्याच्या कुटुंबीयांचाच विश्वास बसत नसल्याचे समोर आले आहे.
 
सुरतला मिळाले पहिले बक्षिस
लक्ष्मण गोंडलिया असे या तरुणाचे नाव आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने बक्षिसांची घोषणा केली आहे. 100 दिवस चालणाऱ्या या योजनेत 50 रुपयांपासून 3000 रुपयांपर्यंतचे ट्रान्झॅक्शन सामिल आहेत. यात डेली, विकली आणि मेगा अवॉर्ड दिले जाणार आहेत. या योजनेचे घोषणा झाल्यानंतर लक्ष्मणने 195 रुपयांचे पेट्रोल दुचाकीत भरले होते. त्याचे पेमेंट कार्डमधून केले होते. त्याला या योजनेची पुरती माहितीही नव्हती. अशा प्रकारे सुरत शहरात प्रथमच कुणाला बक्षिस मिळाले आहे.
 
स्वप्नातही विचार केला नव्हता
लक्ष्मणने सांगितले, की मी एम. जी. शहा माध्यमिक शाळेत कार्यालयीन काम करतो. यासोबत मी इंजिनिअरिंगचा अभ्यास करत आहे. 22 डिसेंबर रोजी मी बराछा येथील पेट्रोल पंपावर कार्डच्या माध्यमातून पेट्रोल भरले होते. मला स्वप्नातही वाटले नव्हते, की मला बक्षिस जाहीर होईल. बक्षिसाची रक्कम माझ्या खात्यात जमा झाली आहे. आता माझ्या मित्रांनीही पक्के केले आहे, की कोणतेही पेमेंट कार्डनेच करणार.
 
पुढील स्लाईडवर बघा, असा आहे लक्ष्मण गोंडलिया...
बातम्या आणखी आहेत...