आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसाराम बापूंनी आता लग्न करावे, आचार्य प्रमोद कृष्णम यांचा सुचक सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर- एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापू यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर आसाराम बापू यांच्याविरुद्ध कलम 376 अंतर्गत लैंगिक शोषण केल्याची तक्रार नोंदविण्यात आली आहे. आसाराम बापूंच्या प्रवक्त्याने आरोप चुकीचे असल्याचे सांगितले असले, तरी माझ्यासोबत आसाराम बापू यांनीच दुष्कर्म केले, या आरोपांवर मुलगी ठाम आहे. यानंतर भारतीय संत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आचार्य प्रमोद कृष्णम यांनी सांगितले, की आसाराम बापूंनी आता लग्न करून टाकावे. त्यांनी संत हे पद सोडून कौटुंबिक आयुष्यात रमायला हवे. देवाची भरपूर कृपादृष्टी असल्याने ते असे वागत आहेत, असे दिसून येते.

असे आहे बलात्कार प्रकरण
दिल्लीतील कमला मार्केट पोलिस ठाण्याचे एसएचओ प्रमोद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यकीय तपासणीत बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले नसले तरी त्यापूर्वी जे काही होत असते त्याचे पुरावे मिळाले आहेत. 16 डिसेंबरच्या सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर लैंगिक शोषणाला बलात्काराचा दर्जा देण्याचा कायदा करण्यात आला आहे. त्यामुळे आसाराम बापूंवर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे बलात्काराची तक्रार नोंदविण्यात आली आहे.

19 ऑगस्ट रोजी पीडित मुलगी आणि तिच्या वडीलांनी दिल्ली येऊन बलात्कार झाल्याची तक्रार दिली आहे. 15 ऑगस्ट रोजी आसाराम बापूंनी जबरदस्ती केल्याचे मुलीने सांगितले आहे.

पॉक्सो कायद्याने आसाराम अडचणीत
आसाराम बापू यांच्याविरुद्ध पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कायद्यानुसर खुद्द आसाराम बापूंना सिद्ध करावे लागेल, की ते निर्दोष आहेत. या कायद्यात पीडित मुलीच्या बयानाला जास्त महत्त्व दिले जाते.

पुढील स्लाईड्समध्ये वाचा पीडित मुलीने काय सांगितले....