आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामींसमोर असे जमिनीवर बसले होते अब्दुल कलाम, म्हणाले- मी वचन पाळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम गेल्या महिन्यात गुजरातच्या बोटादमध्ये बोचासणवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचे (बीएपीएस) प्रमुख स्वामी महाराज यांची सारंगपूर स्वामीनारायण मंदिरात भेट घेतली होती. यावेळी अगदी एखाद्या सामान्य नागरिकांसारखे कलाम त्यांच्यासमोर जमिनीवर बसले होते. दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराचे प्रमुख स्वामी यांच्याशी आध्यात्मिक संवाद साधल्यानंतर कलामांनी ‘ट्रांसेंडेन्स : माय स्पीरिच्युअल एक्सपीरिअंस विद प्रमुख स्वामी’ हे पुस्तक लिहिले होते. हे पुस्तक भेट देताना कलाम म्हणाले होते, की प्रमुख स्वामींवर पुस्तक लिहिण्याचे जे वचन दिले होते ते मी पाळले आहे.
पहिल्यांच भेटीत पाडली छाप
प्रमुख स्वामींसोबत झालेल्या पहिल्या भेटीचा उल्लेख करताना अब्दुल कलाम म्हणाले, की मी जेव्हा त्यांच्यासोबत भेटलो तेव्हा माझ्या मनात विचार आला, की सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा प्रगती करीत संपूर्ण विश्वाचे महानसंताच्या रुपात स्थापित झाले आहेत. त्यांचे हृदय अत्यंत पवित्र आणि अंतःकरण निर्मल आहे. पहिल्या भेटीपासूनच त्यांच्या संदर्भात माझ्या मनात आदरभाव निर्माण झाला. त्यांची माझ्यावर चांगली छाप पडली.
पुढील स्लाईडवर बघा, अब्दुल कलाम आणि प्रमुख स्वामींच्या भेटीची छायाचित्रे.... कलामांनी दिले पुस्तक... स्वांमीनी दिली तुळशीमाळ...