आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे गुजरातचा सायको किलर, जन्मदात्या बापासह केलाय 6 जणांचा खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- गुजरातमधील एका सायको किलरवर सहा हत्येचे आरोप ठेवण्यात आले आहेत. त्याचे नाव किर्ती गामर उर्फ रमेश मकवाना असून वय सुमारे 30 वर्षे आहेत. गेल्या 14 वर्षांमध्ये त्याने हे खून केल्याचा संशय आहे. यातील तीन खून त्याने केवळ तीन महिन्यांमध्ये केले आहेत. पोलिस त्याचा शोध घेत आहे.
दोन भावांचा एकाच वेळी खून
रमेशचे नीता नावाच्या मुलीसोबत लव्ह मॅरेज केले आहे. यापूर्वी त्याने वाघजी आणि तुलसी नावाच्या दोन भावांचा खून केला होता. दोघेही डेंटिस्ट होते. या दोन खुनानंतर शंकेश्वर किंवा राधनपूर परिसरात त्याच्या नावाची दहशत पसरली. विशेष म्हणजे डॉक्टरांमध्ये त्याची दहशत पसरली. त्यामुळे तो त्यांच्याकडून आणि इतरांकडून खंडणी वसूल करीत होता. तो मुळचा पाटण जिल्ह्याच्या रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी पाटण येथील एका डॉक्टराला फोन करुन त्याने दहा लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
2001 मध्ये वडीलांचा खून
भावाच्या लग्नावरुन त्याचे वडीलांसोबत कडाक्याचे भांडण झाले होते. यावेळी त्याने वडीलांचा खून केला. त्याच्याविरुद्ध पोलिसांना ठोस पुरावे मिळाले नाहीत. त्यामुळे तो सुटला. त्यानंतर 2005 मध्ये रमेशच्या भावाला रामसिंह ठकोर नावाच्या व्यक्तीने बेदम मारले होते. त्याचा रमेशने खून केला. बहिणीवर वाईट नजर टाकतो म्हणून रमेशने 2007 मध्ये हरीश वांकर नावाच्या व्यक्तीचा खून केला. हरिशचा मृतदेह त्याने साबरमती नदीत फेकला. तो कधीही सापडला नाही. या प्रकरणीही पोलिसांना ठोस पुरावे मिळाले नाहीत. तो कायद्याच्या चौकटीतून सुटला. रमेश सायको किलर असल्याचे सिद्ध झाले आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यात दोन सख्ख्या भावांचा खून केल्यानंतर त्याने गॅस एजंसीच्या व्यवस्थापकाचा खून केला आहे.
दुसऱ्यांच्या मोबाईलवरुन करतो खंडणीचे फोन
खंडणीसाठी फोन करतो तेव्हा रमेश इतरांचा मोबाईल वापरतो. तो अनोळखी लोकांना सांगतो, की माझी आई आजारी आहे. तिच्याशी फोनवर बोलायचे आहे. माझ्याजवळ फोन नाही. मला तुमच्या मोबाईलवरुन फोन करु द्या. त्यानंतर तो एकट्यात जाऊन फोन करतो. त्यांच्याकडून खंडणी वसूल करतो.
पोलिसांनी रमेशचा फोटो तीन लोकांना दाखविला. त्यांनी कबुल केले, की त्याने आमचा मोबाईल मागितला होता. त्यावरुन फोन केला होता. तो स्वतःच्या फोनचा वापर करीत नाही. त्यामुळे त्याला पकडण्यात अडथळे येत आहेत.