आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Accident News In Marathi, Divya Marathi, Gujarat

गुजरातेत कार अपघातात औरंगाबादचे चौघे ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( छायाचित्र : स्वप्निल बाबूराव कदम)
बार्डोली (गुजरात) - औरंगाबादचे नवउद्योजक स्वप्निल कदम यांची कार कंटेनरच्या मागील चाकांत घुसून झालेल्या भीषण अपघातात त्यांच्यासह औरंगाबादच्या चौघांचा जागीच मृत्यू झाला. सुरत जिल्ह्यात पलसाणा तालुक्यातील कडोदारा गावाजवळ गुरुवारी पहाटे ३.३० वाजता हा अपघात झाला.

मृतांत स्वप्निल बाबूराव कदम (२७, संगीता कॉलनी), जनार्दन वामन ससाणे (३१, पडेगाव), अरविंद जनार्दन पंडित (४५, वसंुधरा कॉलनी), अनिल नाथाजी कांबळे (३५, काचीवाडा) यांचा समावेश आहे. जखमी सचिन घोडेराव (२५, कोटला कॉलनी) यांच्यावर सुरतमध्ये उपचार सुरू आहेत.

रिपाइं (ए) प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम यांचे ज्येष्ठ पुत्र स्वप्निल आपल्या काद्राबादच्या कारखान्याच्या यंत्र खरेदीसाठी उद्योजक अरविंद पंडित व इतर तिघांसह १७ सप्टेेंबरला पहाटे टाटा सफारीतून (एमएच २० बीव्ही ५५९९) अहमदाबादकडे निघाले होते. कडोदारा गावातील मोदी हॉस्पिटलजवळ चालक अिनल कांबळे यांचे कारवरील नियंत्रण सुटून ती समाेर धावणाऱ्या तांदळाने भरलेल्या कंटेनरच्या मागील दोन्ही चाकांत घुसली. यात चाैघे जागीच ठार झाले. त्यांचे मृतदेह औरंगाबादला आणले असून शुक्रवारी अंत्यसंस्कार होतील. ... स्वप्निलचे स्वप्न अधुरे .