आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम यांच्याविरोधात साक्ष देणा-यावर अॅसिड हल्ला, याआधीही दोन वेळा झाले असे हल्ले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत - आसाराम यांच्या विरोधातील बलात्कार प्रकरणातील एका साक्षीदारावर दोन अज्ञातांनी अॅसिड हल्ला केला आहे. दिनेश भावचंदानी (३९) यांच्यावर सुरतमध्ये भर रस्त्यावर अॅसिड फेकण्यात आले आहे. या हल्ल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
डीसीपी शोभा भुतडा म्हणाल्या, दिनेश भावचंदानी यांच्यावर रविवारी अॅसिड फेकण्यात आले आहे. दिनेश वेसू रॉयल रेसि़डेन्सी येथील त्यांच्या घरी जात असताना दोन बाइकस्वारांनी त्यांना ओव्हरटेक केले आणि त्यांच्यावर अॅसिड फेकले.
दिनेश यांच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आसाराम आणि नारायण साई यांच्याविरोधात साक्ष देणा-यांवर हल्ल्याची ही तिसरी घटना आहे.
गुजरात पोलिसांचे म्हणणे आहे, की दिनेशसह तिन्ही साक्षीदारांनी पोलिस संरक्षण घेण्यास नकार दिला होता. इतर साक्षीदारांना आवश्यक ती सुरक्षा देण्यात आली आहे.
स्वयंघोषित संत आसाराम यांच्यावर अल्पवयिन विद्यार्थीनीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या आरोपात ते जोधपूर कारागृहात आहेत. त्यांच्याविरोधात सुरतच्या एका महिलेनेही बलात्काराचा आरोप केला आहे. तर, या महिलेच्या छोट्या बहिणीने आसाराम यांचा मुलगा नारायण साईवर बलात्काराचा आरोप केला आहे.