आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BRTS ट्रॅकवर झाला अपघात, भावीपत्नीसमोरच तरूणाने घेतला अखेरचा श्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोटः शहरतील 150 फूटच्या रिंग रोडवर रविवारी रात्री बालाजी हॉलजवळ बी.आर.टी.एस. ट्रेकवर झालेल्या एका अपघातात राजदिप सिंह राठोड या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तरूणासोबत त्याची भावीपत्नीसुध्दा होती. बस आणि एक्टीव्हामध्ये झालेल्या या अपघातात तरूणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या होणाऱ्या पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मायाणी नगर -4 मध्ये राहाणारा राजदिप रविवारी त्याच्या भावीपत्नी मनाली मकवाणा हिच्यासोबत एक्टीव्हावर फिरायला गेला होता. 150 फूट रिंग रोडवर रहदारी असल्याकारणाने त्याने बी.आर.टी.एस. ट्रॅकवर त्याची एक्टीव्हा नेली, तेवढ्यात समोरुन येत असलेल्या बससोबत त्याची धडक झाली. या अपघातानंतर लगेचच राजदिप याने प्राण सोडले तर मनालीही गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर मनालीला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले. पुढच्या महिन्यात राजदिप आणि मनालीचा विवाह होता.

पुढील स्लाईडवर पाहा, या दुर्घटनेची इतर छायाचित्रे...