आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुस्लिम असल्याने नोकरीस नकार मिळालेल्या जीशानला अदानी ग्रुपमध्ये जॉब

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - मुंबईत गुजरातच्या एका हिरे कंपनीने मुस्लिम असल्याचे सांगत जीशान खान या तरुणाला नोकरी नाकारली होती. अखेर जीशानला नोकरी मिळाली आहे. मुंबईतील घटनेनंतर जीशानला अनेक ऑफर्स आल्या होत्या, त्यात त्याने अहमदाबादमधील अदानी ग्रुप मध्ये काम करण्याचे नक्की केले आहे. जीशानने एमबीए केले आहे, काही दिवसांपूर्वी त्याने एका हिरे कंपनीवर आरोप केला होता, की मुस्लिम असल्यामुळे हिरे कंपनीने नोकरी नाकारली.
जीशानला अनेक ऑफर्स
मुंबईतील घटनेनंतर जीशानला अनेक ऑफर्स आल्याचे त्याने सांगितले आहे. तो म्हणाला, 'धर्मावरुन भेदभाव करत हिरे कंपनीने नोकरी नाकारल्यानंतर मला एक डझन कंपन्यांच्या नोकरीच्या ऑफर्स मिळाल्या. मेल पाठवून अनेक लोकांनी मला आम्ही तुझ्या सोबत असल्याचा विश्वास दिला.' अदानी ग्रुपच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये नेमणुकीच्या फॉर्मेलिटीज पूर्ण करण्यासाठी पोहोचलेला जीशान म्हणाला, 'मला जेवढ्या ऑफर्स मिळाल्या त्यात हा जॉब सर्वात चांगला वाटला. अदानी ही देशातील अग्रेसर कंपनी आहे त्यामुळे मी या ग्रुपसोबत काम करु इच्छित आहे.' कंपनीने जीशानला मुंबईतील कार्यालयात ट्रेनी एक्झिकेटीव्ह या पदावर घेतले आहे. अदानी ग्रुपचे प्रवक्ते म्हणाले, की आम्ही जाती-धर्माच्या पलिकडे जाऊन गुणवत्तेला महत्त्व देतो. जीशान आम्हाला सक्षम उमेदवार वाटला त्यामुळे आम्ही त्याला नोकरीची ऑफर दिली आहे.
15 मिनीटात मिळाला होता रिप्लाय, मुस्लिम असल्याने नोकरी मिळणार नाही
मे महिन्यात जीशानने हरी कृष्णा एक्सपोर्टस् प्रायव्हेट लिमीटेड कंपनीला मेल पाठवून मार्केटिंगच्या जॉबसाठी अर्ज केला होता. त्याने मेल पाठविल्यानंतर 15 मिनीटात त्याला रिप्लाय आला, 'आम्हाल तुम्हाला सांगण्यात दुःख होत आहे, पण आमच्याकडे फक्त गैर-मुस्लिमांनाच नोकरी दिली जाते.' कंपनीचा हा मेल जीशान आणि त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर देशभरातून कंपनीचा निषेध करण्यात आला होता. तसेच जीशाने मुंबईत कंपनीच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार कंपनीवर आयपीसी 153 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर काही दिवसांनीच मुंबईतील एका तरुणीने मुस्लिम असल्यामुळे फ्लॅट मिळत नसल्याची तक्रार केली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जीशानला हिरा कंपनीने पाठवलेला मेल