आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Dadiguru Harrashment Sadhvi Khushabu Back In Familier Life

दादीगुरूंच्या अत्याचाराला वैतागून साध्वीने सन्यास सोडून केला संसारात प्रवेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महेसाणाः आठ महिन्यांपूर्वी दीक्षा घेणारी महेसाणा येथील जैन साध्वी खुशबूने दादीगुरूच्या मानसितक अत्याचाराला वैतागून संयमी जीवन आणि सन्यास सोडण्याचा निर्णय घेतला आहे. खुशबूही जुडो कराटे चॅम्पियन आहे. याबद्दल सांगताना खुशबू म्हणाली की, मी आज संसारीसुध्दा नाही आणि संयमीसुध्दा नाही.. संयमी मार्गावर जाणार्‍या मुलींवर माझ्यासारखी परिस्थिती येऊ नये म्हणून मी याविरोधात आवाज उठवणार आहे आणि वेळ पडलीच तर मी कोर्टातसुध्दा जाण्यास तयार आहे.
जैन धर्माच्या 522 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एकत्र 45 मुमुक्षु 1 डिसेंबरला सुरतमध्ये जैन धर्माची दीक्षा घेणार आहेत. तेव्हा सुरतमधील अडाजण पाटियाजवळ असलेल्या शांतीदीप रेसिडेन्सीमधील उपाश्रयामध्ये दादीगुरूकडून होणार्‍या मानसिक त्रासाला कंटाळून साध्वी खुशबू संयमी जीवनाचा त्याग करणार असल्याची बातमी समोर आली आहे. ज्यामुळे जैन समाजामध्ये गंभीर वातावरण पसरले आहे.
लहानपणापासूनच धार्मिक वातावरणात वाढलेली आणि जुडो कराटेमध्ये राज्य स्तरावर दोन वेळा सुवर्णपदक मिळवणारी महेसाणाचे वकिल महेश महेता यांची 21 वर्षीय मुलगी खुशबूने आठ वर्षांच्या साधनेनंतर 2 मार्च 2014 ला दीक्षा घेतली होती. एक आठवड्याच्या संयमी जीवनानंतर वडीलांच्या घरी परतलेल्या साध्वी जीनागकृपा (खुशबू)ने दादीगुरूवर आरोप लावला आहे की, दीक्षा घेण्याच्या पहिले दादीगुरूला माझ्यामध्ये साध्वी बनण्याची योग्यता दिसली. मात्र दीक्षा घेतल्यानंतर त्याच दादीगुरूंनी माझ्यात साध्वी बनण्याची पात्रता नाही असे सांगत मला माझ्या गुरूंपासून देर ठेवले आणि शाब्दीक त्रास दिला.

पुढील स्लाईडमध्ये पाहा, साध्वी खुशबूच्या कुंटुंबातील फोटो..