आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vandana Was Murdered Due To Suspicion On Her Character

VIDEO: वारंवार मुकेशचे नाव घेतल्याने संतापलेल्या बिरबलने वंदनाची केली हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- वंदना खून प्रकरणी नारणपूरा पोलिस कोणत्याही निष्कर्षावर न पोहोचल्याने क्राईम ब्रांचने तपास हाती घेतला आहे. आता या प्रकरणावरुन हळूहळू पडदा दूर होत आहे. बिरबलने हत्येचा आरोप कबुल केला आहे. वंदना वारंवार मुकेशचे नाव घ्यायची. यामुळे संतापलेल्या बिरबलने तिचा खून केल्याचे उघडकीस आले आहे.
क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की वंदना आणि बिरबल यांच्यात कोणत्याही विषयावर चर्चा सुरु असताना ती कायम मुकेशचे नाव घ्यायची. त्याचे कौतुक करायची. हे बिरबलला आवडत नसे. याचा त्याला प्रचंड राग यायचा. त्यामुळे त्याने रागाच्या भरात वंदनाचा खून केला.
क्राईम ब्रांचजवळ जादुची छडी आहे का...
कोणत्याही प्रकारचा गुन्हा असो अहमदाबादची क्राईम ब्रांच त्याचा तपास लावल्याशिवाय राहत नाही. वंदनाचा खून झाला तेव्हा परिसरात प्रचंड दहशत पसरली होती. खूनावरुन उलटसुलट चर्चा सुरु झाली होती. पण पोलिसांना नेमका गुन्हेगार शोधता येत नव्हता. अखेर हे प्रकरण क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आले. त्यानंतर लगेच खुनावरुन पडदा उठला. त्यामुळे क्राईम ब्रांचकडे जादुची छडी आहे, की काय असे विचारले जाऊ लागले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, वंदनाचा खून झाला ती जागा... बिरबलने कबुल केला गुन्हा...व्हिडिओत बघा काय म्हणाला तो...