आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक वारशाचा दर्जा मिळवणारे अहमदाबाद बनले पहिले भारतीय शहर; ही आहेत कारणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबादमध्ये हिंदू, मुस्लिम आणि जैन धर्मीय लोकांचे एकत्रित राहणे आणि येथील अविश्वसनीय कलाकृतींमुळे शहराला जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे. - Divya Marathi
अहमदाबादमध्ये हिंदू, मुस्लिम आणि जैन धर्मीय लोकांचे एकत्रित राहणे आणि येथील अविश्वसनीय कलाकृतींमुळे शहराला जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे.
नवी दिल्ली / अहमदाबाद - गुजरातचे प्रमुख शहर अहमदाबाद आता वर्ल्ड हेरिटेज सिटी अर्थात जागतिक वारसा शहर झाले आहे. युनेस्कोकडून हा दर्जा मिळवणारे अहमदाबाद भारतातील पहिले शहर आहे. यावर मोदींनी रविवारी ट्वीट करून हा समस्त देशवासियांसाठी आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया दिली. पोलंड येथे युनोस्कोच्या 41 व्या संमेलनात ही घोषणा करण्यात आली आहे. 
 
 
ही आहेत कारणे...
- अहमदाबादमध्ये हिंदू, मुस्लिम आणि जैन धर्मीय लोकांचे एकत्रित राहणे आणि येथील अविश्वसनीय कलाकृतींमुळे शहराला जागतिक वारसाचा दर्जा मिळाला आहे. 
- अहमदाबादेतील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची 26 सुरक्षित स्थळे आणि शेकडो खांब आहेत. 
- महात्मा गांधी सुद्धा येथे 1915 ते 1930 दरम्यान वास्तव्य करत होते. त्यांच्या आठवणींवर प्रकाश टाकणारी अनेक महत्वाची स्थळे या शहरात आहेत. 
- अहमदाबादला जागतिक वारसा शहर घोषित करण्यासाठीच्या प्रस्तावाला तुर्की, लेबनान, ट्युनिशिया, पेरू, कजाखस्तान, फिनलँड, झिम्बाब्वे आणि पोलंडसह 20 देशांनी पाठिंबा दिला.
बातम्या आणखी आहेत...