आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISI च्या 2 एजेंट्‍सला अटक, महिलेद्वारा दोघांना फसवले, ड्रोनने केली हेरगिरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कच्छ (गुजरात)- कच्छ येथील खावडा येथे पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयच्या दोन एजेंट्‍सला अटक केली. अलाना समा आणि शकुर सुमरा असे या दोघांची नावे आहेत. विशेष म्हणजे दोघेही भारतीय आहेत. अहमदाबाद एटीएसने ही कारवाई केली आहे.

गुजरातमध्ये अटक केलेल्या दोघांनी महत्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे, चौकशी सुरु असून त्यांच्याकडे मोबाईल सापडला असल्याची माहिती गुजरात एटीएसचे डीएसपी बी.एस.चावडा यांनी दिली आहे.

एका पाकिस्तानी महिलेने फसवल्याचेही दोन्ही आरोपींनी चौकशीत सांगितले. दोघे ड्रोन आणि फोन कॅमेराद्वारा महत्त्वाच्या ठिकाणांचे फोटोज घेऊन ते पाकिस्तानला पाठवत होते.

एक वर्षापासून होती नजर....
- आयएसआयचा प्रमुख रिझवान अख्तर याला पदावरून हटवण्याची तयारी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये तणाव पसरवण्याचा आयएसआयचा प्रयत्न आहे.
- पोलिस अधिकार्‍याने सांगितले की एटीएस या दोघांवर गेल्या वर्षापासून लक्ष ठेवून होती.
- बुधवारी रात्री दोघांना त्यांंच्या घरातून अटक करण्‍यात आली.
- दोघांकडून 7 महत्त्वाचे दस्तावेज, एक पाकिस्तानी सिम कार्ड आणि मोबाइल जप्त करण्यात आला आहे.
- दोघांचे कॉल इंटरसेप्ट करण्यात आले होते. पाकिस्तानी अधिकार्‍यांना लष्कराच्या हलचालींची माहिती देत होते.
बातम्या आणखी आहेत...