आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस्ड कॉलने रोखले अपहरण, पतीचे कारस्थान आणले उघडकीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - महिला हेल्पलाइन अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी किती मदतगार ठरू शकते याचे ताजे उदाहरण गुजरातमध्ये समोर आले आहे. गुजरातची महिला हेल्पलाइन अभयमला (१८१) चार दिवसांपूर्वी एका वैतागलेल्या महिलेने फोन केला होता. ती काही बोलण्याच्या अगोदरच फोन कटला. काही तरी गडबड असल्याचे हेल्पलाइनच्या समन्वयकाला वाटले. हा विचार करून समन्वयकाने कॉलबॅक केला. ज्या महिलेने फोन केला होता ती पूर्ण सतर्क होती. तिने फोन बंद करण्याऐवजी चालू ठेवला, जेणेकरून तेथे चालू असलेली चर्चा हेल्पलाइनचे लोक सहजपणे ऐकू शकतील. तिने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळेच पोलिसांना काय घडत आहे याची माहिती मिळू शकली. तिचा पतीच तिचे कथित अपहरण करत होता.

पत्नीला मेहसाना येथील सासरच्या घरापासून दूर नेण्याचा कट पतीने रचला होता. आम्ही दुसर्‍यांदा फोन केला तेव्हा महिलेने फोन रिसीव्ह केला नाही. तिने गुपचूपणे फोन होल्डवर ठेवला. त्यामुळेच आम्ही तिचे आणि पतीचे भांडण ऐकू शकलो, असे समन्वयक नरेंद्र गोहिल यांनी सांगितले. या महिलेला बळजबरीने दुसरीकडे नेले जात असल्याचे आम्हाला फोनवरील संभाषण ऐकल्यानंतर वाटले. त्यानंतर आम्ही तत्काळ गांधीनगर आणि मेहसाना पोलिसांशी संपर्क केला आणि सगळी हकिगत सांगितली.

हे दोघे कोठे आहेत, हे आम्हाला ठाऊक नव्हते. कदाचित तिने पतीचा फोन वापरला असेल. कारण तिने तो चालू ठेवला होता. त्यानंतर काही वेळातच तिच्या १३ वर्षीय मुलीचा फोन आला. त्यामुळे सर्व प्रकरण लक्षात आले. दांपत्यामध्ये गेल्या तीन वर्षांपासून भांडण सुरू होते. पती त्यांना मेहसाना येथील घरात ठेवण्यासाठी बळजबरीने नेले जात होते, जेणेकरून कोणाला काही सांगण्याची गरज पडणार नाही, असे त्यांना वाटत होते. कलोलला पोहोचल्यानंतर बसने नेले जात होते. पोलिसांनी बसला ट्रॅक केले. गांधीनगर पोलिसांनी कलोल शहरात बस पोहोचताच ती रोखली. पतीला बसमधून बाहेर काढले आणि अटक केली.
बातम्या आणखी आहेत...