आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकी खासदारांचे नरेंद्र मोदींना निमंत्रण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींबाबत अमेरिकेच्या कठोर धोरणात हळूहळू मवाळपणा येत आहे. गुजरात भेटीवर आलेल्या अमेरिकी संसदपटूंनी मोदींची भेट घेऊन त्यांना आपल्या देशात येण्याचे निमंत्रण दिले आहे.

इलिनॉयमधील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज्चे रिपब्लिकन पक्षाचे संसद सदस्य अ‍ॅरोन शॉक यांच्या नेतृत्वाखाली हे प्रतिनिधीमंडळ गुजरात दौ-यावर आले आहे. मोदींच्या कार्यशैलीमुळे आपण ‘इंप्रेस’ झाल्याचे अ‍ॅरोन यांनी सांगितले. मोदींच्या या अनुभवांचा फायदा आम्हालाही मिळावा म्हणून आम्ही त्यांना अमेरिका दौ-याचे आमंत्रण दिले आहे. गोधरा 2002 दंगलींनंतर अमेरिकेने मोदी यांना व्हिसा देण्यास नकार दिला होता. या मुद्द्यावर शॉक म्हणाले, याबाबतीत आपण अमेरिकेच्या प्रशासनासोबत चर्चा करू. प्रतिनिधी मंडळाने गुजरातमधील सकारात्मक व्यावसायिक वातावरणाचेही तोंडभरून कौतुक केले. त्यांनी मोदींसोबत व्यापारिक संबंध आणि परस्पर हितांच्या मुद्द्यावर चर्चा केली.


जून महिन्यात अमेरिका दौरा?
येत्या जून महिन्यात मोदी यांचा अमेरिका दौरा अपेक्षित आहे, असे उद्योगपती व ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपीज’चे सदस्य सालभकुमार यांनी सांगितले.