आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माया कोडनानी नरोडा गामला गेल्या नाही, विधानसभा-सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सोबत होत्या - शहा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विशेष कोर्टात साक्ष नोंदवल्यानंतर कोर्टातून बाहेर पडताना अमित शहा. - Divya Marathi
विशेष कोर्टात साक्ष नोंदवल्यानंतर कोर्टातून बाहेर पडताना अमित शहा.
अहमदाबाद - गुजरातच्या 2002 मधील नरोडा गाम दंगलीत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज अहमदाबाद येथील विशेष कोर्टात साक्ष नोंदवली. वृत्तसंस्थेने म्हटल्यानुसार, अमित शहांनी कोर्टाला सांगितले की त्या दिवशी ते विधानसभेत होते. माया कोडनानी नरोडा गामला गेल्या नाही. सकाळी 8.30 वाजता माया कोडनानी त्यांच्यासोबत होत्या. विधानसभेत श्रद्धांजली सभा झाली त्यानंतर मी सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथेही माया कोडनानी यांची भेट झाली होती. त्यानंतर माया कोडनानी कुठे गेल्या हे माहित नाही. 
 
शहांनी कोर्टाला काय सांगितले
- वृत्तसंस्था एएनआयनुसार, भाजप अध्यक्ष अमित शहांनी कोर्टाला सांगितले की नरोडा गाममध्ये माया कोडनानी नव्हत्या. शहा म्हणाले, 'सकाळी 8.30 वाजता मी विधानसभेत होतो. मी 9.30 ते 9.45 वाजतापर्यंत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होतो. तिथे माझी भेट कोडनानी यांच्यासोबत झाली. हॉस्पिटलमधून निघताना लोकांनी मला घेराव टाकला. जवळपास 11.15 वाजता पोलिसांनी मला आणि कोडनानी यांना आपल्या जीपने सरकारी गाड्यांपर्यंत सोडले.'
- गोध्रा हत्याकांडाच्या दुसऱ्या दिवशी 28 फेब्रुवारी 2002 ला नरोडा गाम येथे 11 जणांची हत्या झाली होती. या दंगलीच्या आरोपात कोडनानीसह 80 जणांवर दंगल भडकवण्याचा आरोप आहे. 
 
वकीलांनी काय सांगितले... 
पीडितांचे वकील शमसाद पठाण म्हणाले, '28 फेब्रुवारी 2002 च्या दंगल प्रकरणी अमित शहा कोर्टात हजर झाले. त्यांनी सांगितले की माया कोडनानींना 8.30 वाजता विधानसभेत पाहिले होते. त्यानंतर 11 ते 11.30 दरम्यान हॉस्पिटलमध्ये पाहिले. या दरम्यान कोडनानी कुठे होत्या, याची मला माहिती नाही.'
- कोडनानींचे वकील म्हणाले, 'आज शहा यांच्यासोबत आमच्याकडून 57 साक्षीदार हजर झाले आहेत.'
 
कोडनानींचा दावा - दंगलीच्यावेळी शहांच्यासोबत होते
- कोडनानी यांनी अपील केले होते. त्यानंतर एसआयटी कोर्टाचे जज पीबी देसाई यांनी 12 सप्टेंबरला शहांना समन्स बजावले होते. 
- सुनावणीत कोडनानी यांच्यावतीने सांगण्यात आले होते की दंगल झाली तेव्हा त्या विधानसभेत हजर होत्या. त्यानंतर अमित शहांसोबत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्या. 
- 27 फेब्रुवारीला गोध्रा कांडात मारल्या गेलेल्या 59 कारसेवकांचे मृतदेह तिथे आणण्यात आले होते. 
- कोडनानींनी 14 साक्षीदारांची नावे दिली होती. शहांसोबत 13 जणांनी त्यांच्या बाजूने साक्ष दिली आहे. कोडनानी यांना या दंगल प्रकरणी 28 वर्षांची शिक्षा झाली असून सध्या त्या जामीनावर आहेत. 
 
कोडनानींसह 30 जण दोषी 
- सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर गुजरात दंगलीतील नऊ महत्त्वांच्या खटल्यांच्या तपासासाठी नियुक्त एसआयटीने नरोडा गाम केसचाही तपास केला होता. 
- कोर्टाने 2012 मध्ये कोडनानी यांच्यासह बजरंग दलाचा नेता बाबूभाई पटेल उर्फ बाबू बजरंगीसह 30 जणांना दोषी ठरविले होते. 
- या हत्याकांडात दोषी ठरविल्यानंतर कोडनानी यांना 28 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. जुलै 2014 मध्ये प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर झाला होता.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, गुजरात स्पेशल कोर्टाबाहेरील फोटो...
बातम्या आणखी आहेत...