आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा फेसबुकवर राजीनामा, FB वर लिहीलेे मी 75 वर्षाची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी सोमवारी अचानक फेसबुकवर राजीनाम्याची घोषणा केली. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांनाही राजीनामा दिला आहे. देशाच्या राजकारणात पहिल्यांदाच एखाद्या मुख्यमंत्र्याने अशा पद्धतीने राजीनामा दिला आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीत आनंदीबेन यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. त्यामुळे त्या बदलल्या जाण्याची चर्चा दीर्घकाळापासून होत होती. मात्र त्यांनी ७५ वर्षे वय हे राजीनाम्याचे कारण दिले आहे.
१५ ऑगस्टनंतर आनंदीबेन यांना राज्यपालही केले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. आता नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीसाठी स्पर्धा सुरू झाली आहे. सध्या अर्थमंत्री नितीन पटेल, भाजप प्रदेशाध्यक्ष विजय रूपाणी व केंद्रीय मंत्री पुरूषोत्तम रूपाला हे स्पर्धेत आहेत. भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी राजीनाम्याला दुजोरा दिला.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, फेसबुकवर राजीनामा देणाऱ्या आनंदीबेन पहिल्याच मुख्यमंत्री, ​ आनंदीबेन यांच्‍यविषयी..
बातम्या आणखी आहेत...