आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिथरलेल्या बैलाने घेतला वृद्धाचा जीव, अर्धा तास शिंगांनी मारले, बघा VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिद्धपूर (गुजरात)- भटक्या जनावरांमुळे या शहरातील लोकांचे जीवन अवघड झाले आहे. त्यामुळे एखाद्या लहान मुलाला किंवा म्हाताऱ्या माणसाला काही आणण्यासाठी पाठवणेही अशक्य झाले आहे. सोमवारी एका बैलाने एका वृद्धावर जोरदार हल्ला चढवला. तब्बल तीस मिनिटे तो वृद्धाला शिंगांनी मारत होता. या दरम्यान कुणालाही जवळपास फटकू दिले नाही. यावेळी लोकांनी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे पसंत केले. मात्र त्याला मदत केली नाही.
व्हिडिओ बनवत होते लोक
- मफतभाई असे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे. ते साठी पार केलेले आहेत.
- काही कामानिमित्त मफतभाई दरजी रोडवरुन जात होते. यावेळी त्यांच्यासोबत कुणीही नव्हते.
- यावेळी बैलाने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. सुमारे तीस मिनिटे तो त्यांना शिंग मारत होता.
- मफतभाई यांनी सुरवातीला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण बैलाचा हल्ला एवढा भीषण होता की ते जमिनीवर आदळले.
- यावेळी काही लोक त्यांना वाचविण्यासाठी समोर आले. पण बैलाने त्यांना जवळही फिरकू दिले नाही.
- बैलाने अख्खा रस्ता वेठिस धरला होता. कुणालाही त्या रस्त्यावरुन तो जाऊ देत नव्हता.
- जरा वेळाने लोकांनी बैलावर नियंत्रण मिळवले. मफतभाई यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
- पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पुढील स्लाईडवर बघा या घटनेचे फोटो... अखेरच्या स्लाईडवर व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...