आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ants Lives In Ahmedabad Girl\'s Ear, Doctor Remove Ants

PHOTOS: 12 वर्षीय मुलीच्या कानात राहत होत्या मोठ्या मुंग्या, वैद्यकीय क्षेत्रातील मिरॅकल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रेया दारजीचा फोटो. याच मुलीच्या कानात मुंग्या झाल्या होत्या. - Divya Marathi
श्रेया दारजीचा फोटो. याच मुलीच्या कानात मुंग्या झाल्या होत्या.
अहमदाबाद (गुजरात)- एका 12 वर्षीय मुलीच्या कानात अनेक मुंग्या राहत होत्या, अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. तिच्या कानातून दररोज मुंग्या बाहेर येत होत्या. याची तक्रार तिने आईवडीलांकडे केली होती. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्या कानातून दोन-तीन वेळा 10-15 मुंग्या काढल्या. पुढेही तिच्या कानातून मुंग्या येत राहिल्या तर तिला सीसीटीव्ही निगराणीत ठेवले जाणार आहे.
या मुलीचे नाव श्रेया आहे. गेल्या वर्षीय ऑगस्ट महिन्यात श्रेयाने कानात दुखत असल्याची, त्रास होत असल्याची तक्रार आईवडीलांकडे केली होती. त्यानंतर वडील संजय दारजी तिला घेऊन डॉक्टरांकडे गेले. डॉक्टरांनी तिच्या कानातून 9 ते 10 मुंग्या बाहेर काढल्या. ती झोपली असताना कानात मुंग्या गेल्या असतील, असे डॉक्टरांनी सांगितले. आता ही समस्या दूर झाली असे डॉक्टरांसह या मुलीला आणि तिच्या आईवडीलांना वाटले.
पण तरीही कानात दुखत असल्याची, त्रास होत असल्याची श्रेया सारखी तक्रार करत होती. तिच्या कानातून वारंवार मुंग्या बाहेर येत होत्या. त्यानंतर संजय दारजी तिला घेऊन शहरातील नाक, कान, घसा स्पेशालिस्ट डॉ. जवाहर तलसानिया यांच्याकडे घेऊन गेले. मुलीची तपासणी केल्यावर डॉ. तलसानिया म्हणाले, की माझ्या 32 वर्षांच्या करिअरमध्ये मी पहिल्यांदा अशी विचित्र केस बघितली आहे. ती माझ्याकडे काल आली होती. तिच्या कानातून मी 10 मोठ्या आकाराच्या मुंग्या काढल्या.
डॉ. तलसानिया पुढे म्हणाले, की या मुलीची केस माझ्यासाठी फार आव्हानात्मक आहे. वैद्यकीय इतिहासातही अशा प्रकारची ही पहिलीच केस असावी. या मुंग्या तिला कानात चावत असाव्यात. त्यामुळे तिचा कान दुखत होता. तिला चिडचिड होत होती. पण या मुंग्यांमुळे तिच्या कानाला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. यापुढेही तिच्या कानातून मुंग्या येत राहिल्या तर तिला सीसीटीव्ही निगराणीत ठेवले जाईल.
संजय म्हणाले, की तिच्या कानात मोठ्या मुंग्या गेल्याची घटना आमच्या स्मरणात नाही. तसेच दररोज तिच्या कानात मुंग्या जाऊ शकत नाहीत. आमच्या कुटुंबात कोणत्याही व्यक्तीला अशा स्वरुपाचा आजार झालेला नाही.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या संबंधिचा व्हिडिओ....