आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींनी भेटीसाठी वेळ दिला नाही, भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल 16 प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. मात्र, त्यांचा ताफा गांधीनगरमध्ये अडविण्यात आला. मोदींची वेळ न घेता केजरीवाल त्यांच्या भेटीसाठी निघाले होते. या भेटी दरम्यान ते मोदींना 16 प्रश्नांची उत्तरे मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. अहमदाबादहून गांधीनगरला रवाना होण्यापूर्वी केजरीवाल यांनी माध्यमांना 16 प्रश्न वाचून दाखविले. ते म्हणाले, मोदींना भेटून या प्रश्नांचे उत्तर मागणार आहे.
मीडिया अटेंशनसाठी केजरीवालांचा ड्रामा
तीन दिवसांपासून गुजरात दौ-यावर असलेल्या केजरीवालांनी शुक्रवारी अहमदाबादमध्ये माध्यमांशी बोलताना गुजरातच्या विकासाचा दावा पोकळ असल्याचा आरोप केला. त्यांनी मोदी सरकारला 16 प्रश्न विचारले. या प्रश्नांचे उत्तर मागण्यासाठी मोदींची भेट घेण्यासाठी जात असल्याचेही माध्यमांना सांगितले. मात्र, मोदींची भेटीसाठी वेळ घेतली किंवा नाही हे सांगण्याचे त्यांनी सफाईने टाळले. जेव्हा मुख्यमंत्री कार्यालयाआधी त्यांना अडविण्यात आले तेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मागण्यासाठी जाण्यापासून आण्हाला अडविण्यात येत असल्याचे वक्तव्य केले. तासाभरात आपचे नेते केजरीवाल यांनी दोन वेगवेगळी वक्तव्य केल्याचे माध्यमांसमोर उघड झाले.
पोलिसांनीही त्यांचा ताफा अडविण्यात आल्याचे नाकारले. तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या भेटीची वेळ मिळाली आहे, का एवढेच विचारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. जवळपास 45 मिनीटे गांधीनगरमध्ये हा ड्रामा सुरु होता. मुख्यमंत्र्यांची वेळ मागण्यासाठी गेलेल मनिष सिसोदिया रिकाम्या हाताने परतले. तेव्हा केजरीवाल म्हणाले, आम्हाल सांगण्यात आले, की मुख्यमंत्र्यांकडे आज वेळ नाही. आम्ही त्यांना उद्या किंवा परवाची वेळ मिळाली तरी चालेल असे सांगितले. दरम्यान, दुपारी 12 ते 1 तासभर हा ड्रामा सर्व चॅनल्सवर लाइव्ह दाखवण्यात आला. यातून आपला हवी असलेली प्रसिद्धी मिळाली, असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
भाजपाचा सवाल
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाटी निघाले मात्र, त्यांनी त्यांच्या भेटीसाठी वेळच मागितला नाही. भाजपचे नेते नलिन कोहली म्हणाले, जेव्हा केजरीवाल यांनी दिल्लीत मुख्यमंत्री असतानी जनता दरबार भरविला होता. तेव्हा वेळ न घेता हजारो लोकांनी गर्दी केली होती. त्यावेळी केजरीवाल जनता दरबार सोडून पळून गेले होते.
भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, मोदींची वेळ न घेता केजरीवाल यांनी माध्यमांजवळ त्यांच्या भेटी साठी निघालो असल्याचे सांगितले आहे. या अर्थ काय घ्यायचा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
रोज वाद
केजरीवाल 5 मार्च पासून गुजरात दौ-यावर आहेत. त्याच दिवशी (बुधवार)निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यामुळे आदर्श निवडणूक आचारसंहिता लागू झाली. केजरीवाल अनेक गाड्यांचा ताफा घेऊन गुजरातमध्ये रोड शो करीत असल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना अडविण्यात आले. गुरुवारी त्यांनी मोदींवर गंभीर आरोप केले. मोदी विरोधक उभेच राहू देत नाहीत. विरोधकांना धमकावतात एवढेच नाही तर विरोधकांना संपवतात. शुक्रवारी त्यांनी अचानक मोदींना भेटण्याची घोषणा केली.
केजरीवालांचे काही प्रश्न
१ - सुशिक्षित तरुणांना कंत्राटी नोकरी का दिली जात आहे? तरुणांना केवळ 5300 रुपये महिना दिला जात आहे, एवढ्या तुटपूंज्या रकमेत कोणाची गुजराण होणार आहे?
२ - गुजरातच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारांची सुविधा का नाही?
३ - राज्यातील लघु उद्योग का बंद झाले?
४ - शेतक-यांच्या जमीनी उद्योजकांना कवडीमोल भावाने का दिल्या गेली? काही ठिकाणी तर, एक रुपया चौरस फुटाने जमीनीची विक्री झाली आहे, यामागील तर्क काय होता?
५ - तुमच्याकडे स्वतःचे खासगी हेलिकॉप्टर किती आहेत? तुम्ही ते खरेदी केले आहेत, की उद्योगपतींनी तुम्हाला भेट म्हणून दिले?
६ - तुमच्या विमानप्रवासावर किती खर्च होतो आणि त्यासाठीचा पैसा कोठून येतो?

छायाचित्र - केजरीवाल याच कारमधून मोदींच्या भेटीला निघाले आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, काय आहे आपची निती