आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॅलेंटाइनला लव्ह स्टोरीचा अंत, सैनिकाने पत्नी आणि प्रियकरावर झाडल्या गोळ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावनगर (गुजरात) - भारतीय लष्करातील एका सैनिकाने पत्नी आणि मित्राला आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर दोघांनाही लगेच गोळ्या घातल्या. सैनिकाची पत्नी गंभीर असून तिच्या प्रियकराचा जागेवरच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्करात सैनिक या पदावर असलेले जिगरभाई व्यास घरी आले तेव्हा त्यांच्या पत्नीने बराचवेळ दार उघडले नाही. त्यानंतर त्यांना संशय बळावला. घरात काहीतरी घडल्याचा अंदाज आला. त्यानंतर ते दार तोडून आत शिरले. पण आतले दृष्य बघितल्यावर त्यांचा त्यांच्या डोळ्यांवरच विश्वास बसेना.
त्यांची पत्नी चेतना आणि कौटुंबिक मित्र रणजीत आपत्तीजनक स्थितीत आढळून आले. ते दृष्य पाहिल्यानंतर जिगरभाई यांचा राग अनावर झाला. त्यांनी सर्व्हिस रिव्हॉल्वरने दोघांवर गोळ्या झाडल्या. यात रणजीतचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, चेतना जबर जखमी झाली. चेतनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे.
पत्नी आणि तिच्या प्रियकराला गोळ्या घातल्यानंतर जिगर यांना आत्महत्या करायची होती. मात्र पोलिस वेळेवर त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांनी त्यांना समजावून शरण येण्यास सांगितले.
घटनेसंबंधीचा आणखी छायाचित्रे पुढील स्लाइडवर...
(फोटो - जगिरभाईने रणजितला बाथरुममध्ये गोळ्या घातल्या. तिथे पडलेला त्याचा मृतदेह.)