आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्टिस्ट जेरामभाई पटेल यांचे निधन, सेवकाला देऊन गेले एक कोटी रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेरामभाई पटेल (फाइल फोटो) - Divya Marathi
जेरामभाई पटेल (फाइल फोटो)
बडोदा (गुजरात) - आर्टिस्ट जेरामभाई पटेल (86) यांचे सोमवारी निधन झाले. मृत्यू आधी त्यांनी सेवक डायाभाई मारवाडी यांना एक कोटी रुपये आणि इतर आठ जणांना प्रत्येकी 50 हजार रुपये देऊन गेले.

काय झाले होते जेरामभाईंना
- जेरामभाई यांना अर्धांगवायू झाला होता. त्यांना प्रत्येक कामासाठी कोणाची तरी मदत लागत होती.
- जेरामाभाई यांचे सेवक डायाभाई सावलीसारखे त्यांच्यासोबत राहात होते. 42 वर्षांपासून ते त्यांची देखभाल करत होते.
- डायाभाई सांगतात, 'मी 12 वर्षांचा होतो तेव्हापासून साहेबांची (जेरामभाई) सेवा करत होतो. त्यांच्या आणि माझी ओळख बडोद्याच्या एस.एस विद्यापीठात झाली होती. तेव्हा मी मॉडेल म्हणून कला विभागात जात होतो. साहेबांनी मला विचारले माझ्यासोबत राहाशील का, तेव्हापासून मी त्यांच्यासोबत होतो. मी नशीबवान आहे, त्यांच्यामुळे माझ्यासारख्याचे भले झाले.'

कोण होते जेरामभाई, का स्वस्तात विकली पेटिंग्ज
- जेरामभाईंनी अनेक माध्यमांमध्ये काम केले. त्यांनी 250 हून अधिक पेंटिंग, स्कल्पचर, आर्टवर्क दिल्लीतील किरण नादार म्यूझियमला 6 कोटी रुपयांमध्ये दिले होते.
- गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये त्यांनी स्वतः ही डील केली होती. त्यांनी स्वतः जवळ फक्त पाच पेंटिंग ठेवल्या होत्या.
- अनेक मोठ्या कलाकारांकडून भेट म्हणून मिळालेल्या पेटिंगही त्यांनी म्यूझियमला दिल्या होत्या.
- कला क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे, की जेरामभाईंनी त्यांच्या कलाकृती बाजारात विक्रीसाठी ठेवल्या असत्या तर 25 कोटीं रुपये तर नक्कीच मिळाले असते.
- मुंबईच्या जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये जेरामभाईंनी कलेचे शिक्षण घेतले होते. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन देश-विदेशात 100 हून अधिक ठिकाणी झाले होते.
- त्यांची इच्छा होती, की त्यांची कला जास्तित जास्त लोकांपर्यंत पोहोचावी. त्यासाठी त्यांनी स्वस्तात पेंटिंग्ज म्यूझियमसाठी दिले.

शेवटच्या दिवसांमध्ये ते म्हणाले
- आता माझे वय झाले आहे. माझा एकुलता एक मुलगा अमेरिकेत आहे. त्याला आर्ट बद्दल काही माहित नाही.
- माझ्यानंतर माझा कलेचा वारसा कोण सांभाळणार ? यासाठी मी माझे आर्टवर्क म्यूझियमला देण्याचा निर्णय घेतला. कारण तिथे तरी लोक त्यांना पाहू शकतील.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, जेरामभाईंची अंत्ययात्रा