आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे झाले ‘हार्दिक’ स्वागत, तर्कवितर्कांना सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - गुजरातमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांच्या समर्थकांच्या भेटीगाठी घेतल्याने तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे.
केजरीवाल चार दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरच्या मैदानावर तळ ठोकण्यासाठी केजरीवाल उत्सुक असल्याचे दिसून येते. त्यामुळेच त्यांनी पाटीदार समाजाला आपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हार्दिक पटेल यांना गुजरातमधील सर्व विरोधकांचा पाठिंबा आहे. लोकांची इच्छा असल्यास तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजकारणात उतरू, असे हार्दिक यांनी अगोदरच स्पष्ट केले होते. त्यामुळे ते तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राज्यात आणखी घमासान पाहायला मिळू शकते. दरम्यान, पाटीदारांचे ऑगस्ट २०१५ मध्ये आंदोलन झाले होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या कारवाईत १२ तरुण व एका पोलिसाचा मृत्यू झाला होता.तुम्ही आरक्षणासाठी तुम्ही काय करू शकाल, असे प्रश्न हार्दिक पटेल यांनी पत्रातून विचारले आहेत.
बातम्या आणखी आहेत...