आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये केजरीवालांचा \'रोड शो\' रोखला; आप- भाजप कार्यकर्त्यांमध्ये \'फ्री स्लाईल\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद/दिल्ली- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचा 'रोड शो' रोखल्यामुळे खळबळ उडाली आहे. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना गुजरात पोलिसांनी अटक केल्यामुळे 'आप'च्या कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. केजरीवाल यांच्या अटकेचे तीव्र पडसाद दिल्लीत तत्काळ उमटले. 'आप'च्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या मुख्यालयावर निषेध मोर्चा काढला. नरेंद्र मोदींच्या विरोधात निदर्शने केली. यादरम्यान, भाजप आणि 'आप'च्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दगडफेकही केली.

यावेळी 'आप'चे नेते आशुतोष आणि शाजिया इल्‍मी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. निदर्शनादरम्यान 'आप'च्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयात बेकायदा प्रवेशही करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर 'आप'च्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयात तोडफोड केली. याशिवाय भाजप कार्यालयावर दगडफेकही केली.

'आप'च्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या दगडफेकीला भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेकीने प्रत्युत्तर दिले. कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या अंगावर खुर्च्या फेकल्या. परंतु शांततेत निदर्शने करत असल्याचे 'आप'च्या नेत्यांनी म्हटले. या सगळ्या प्रकाराला भाजपतर्फे सुरुवात झाल्याचा आरोप 'आप'च्या नेत्यांनी केला आहे.

शाजिया इल्मी म्हणाल्या, महाराष्ट्रात कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हेदेखील दोन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. तेथेही त्यांच्या जाहीर सभा झाल्या. मात्र, त्यांची सभा रोखण्याची कोणाची हिम्मत झाली नाही. गुजरातमध्ये केजरीवाल यांचा रोड शो का रोखण्यात आला? केजरीवाल यांचा रोड शो पूर्वनियोजित होता. त्यामुळे केजरीवाल यांना गुजरात पोलिसांनी ताब्यात घ्यायला नको होते.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून छायाचित्रातून पाहा, भाजप- आपमधील राडा..