आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमनाथ दर्शनाला गेले केजरी, म्हणाले- सूरत कार्यक्रम BJP च्या इशाऱ्यावर रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमनाथमध्ये केजरीवाल यांनी सहकुटुंब पूजा केली. - Divya Marathi
सोमनाथमध्ये केजरीवाल यांनी सहकुटुंब पूजा केली.
अहमदाबाद (गुजरात) - आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शनिवारी सकाळी गुजरातमध्ये पोहोचले. त्यांनी सहकुटुंब ज्योतिर्लिंग सोमनाथचे दर्शन घेतले. राजकोट विमानतळावर आप कार्यकर्त्यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यावेळी सूरतचा कार्यक्रम रद्द झाल्यावरुन त्यांनी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्यावर टीका केली. केजरीवाल यांच्यासोबत आपचे नेते कुमार विश्वास देखील होते.

10 जुलै रोजी सूरतमध्ये होणार होता कार्यक्रम
> मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या उपस्थितीत 10 जुलै रोजी सूरतमध्ये मेळावा होणार होता. तो अचानक रद्द करण्यात आला.
> ज्या सभागृहात केजरीवालांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याची बुकिंग सभागृहाच्या संचालकांनी तडकाफडकी रद्द केली.
> यामागे भाजचा डाव असल्याचा आरोप आप नेत्यांनी केला.
आप नेते म्हणाले- केजरीवाल यांच्यामुळे गुजरात सरकार घाबरले
> गुजरातमधील आप नेते म्हणाले, भाजप सरकार केजरीवालांना घाबरली आहे. त्यामुळेच त्यांनी सभागृहाच्या संचालकांवर दबाव आणून बुकिंग रद्द करण्यास भाग पाडले.
> गुजारतच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या इशाऱ्यावरुनच बुकिंग रद्द झाल्याचा आरोप आपने केला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कसे झाले गुजरातमध्ये केजरीवालांचे स्वागत, कोण-कोण होते सोबत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...