आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram 2500 Cr Property And Asaram Ashram Vandalised In MP

आसाराम यांच्याकडून IT वसूल करणार 750 कोटी, नारायण साईची पत्नी आरोपावर ठाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबादमधील एका साधकाच्या घरातून कागदपत्रांचे 42 पोते सापडले, त्यातून 2500 कोटी रुपये संपत्तीचा खुलासा झाला. - Divya Marathi
अहमदाबादमधील एका साधकाच्या घरातून कागदपत्रांचे 42 पोते सापडले, त्यातून 2500 कोटी रुपये संपत्तीचा खुलासा झाला.
सूरत/ उज्जैन - आसाराम आणि त्यांचा मुलगा नारायण साई पुन्हा चर्चेत आले आहेत. आयकर विभागाने (इनकम टॅक्स) त्यांच्या संपत्तीची रिपोर्ट तयार केला असून त्यानुसार 2500 कोटी रुपयांची त्यांची संपत्ती आहे. त्याआधारावर त्यांच्याकडून 750 कोटी रुपयांपेक्षा जास्त वसूली केली जाणार आहे. दुसरीकडे मध्यप्रदेशातील उज्जैनमध्ये सिंहस्थ कुंभ सुरु होण्याआधी साधुंनी आसाराम यांच्या आश्रमावर ताबा मिळविला असून त्यांचे पोस्टर्स फाडून फेकले आहेत.

पासवर्ड मिळवण्यासाठी झाला मोठा त्रास, 100 हून अधिक संपत्तींची माहिती
- अल्पवयिन विद्यार्थीनीवर बलात्काराच्या आरोपात जोधपूर तुरुंगात असलेले आसाराम यांच्या अहमदाबादमधील एका साधकाच्या घरातून कागदपत्रांचे 42 पोते सापडले होते.
- कित्येक लॅपटॉप आणि कॉम्प्यूटरही जप्त करण्यात आले. त्यातील बहुतेकांना डबल पासवर्ड देण्यात आले होते.
- योग्य पासवर्ड टाकल्यानंतरही स्क्रिनवर इन करेक्ट असा मॅसेज येत होता.
- जेव्हा कळाले की या लॅपटॉप आणि कॉम्प्यूटर्सला डबल पासवर्ड देण्यात आले आहेत, तेव्हा ते उघडले गेले.
- आयकर विभागाने एवढे कष्ट घेऊन उघड केलेल्या कॉम्प्यूटर्समधून आसारामच्या 2500 कोटी रुपये संपत्तीच्या घबाडाचा खुलासा झाला आहे.
- आयकर विभागाने त्यांचा रिपोर्ट तयार करुन सीबीडीटीला पाठविला असून आसारामकडून 750 कोटी रुपये कर वसूल करण्याचे निश्चित केले आहे.
संपत्तीवर टाच
- आसाराम आणि नारायण यांच्यावर 750 कोटी रुपये कर लावण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी देशभरातील त्यांच्या 100 पेक्षा जास्त संपत्तीवर टाच आणण्याची तयारी सुरु केली आहे.
- या संपत्तीमध्ये जमीन, प्लॉट यांचा समावेश आहे. आयकर विभाग ही संपत्ती जप्त करत आहे, त्यामुळे तिची विक्री आता होऊ शकत नाही.
- या संपत्तीची किंमत 1500 ते 2000 कोटी रुपयांपर्यंत आहे. सर्च ऑपरेशनचा आकडा पाहिला तर ही किंमत दुप्पट होऊ शकते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, उज्जैनमध्ये साधूंनी काय केले
>> सूरत कोर्टात नारायण साईच्या पत्नी काय साक्ष दिली...