आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- स्वत:ला संत म्हणवून घेणा-या आसाराम बापूने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. धर्म आणि शास्त्रांनुसार, संताचे बोल व भाषा समाजाला प्रेरणा देणारी व जीवनाकडे आशावादी पाहण्याकडे शिकवते. मात्र आसाराम बापूच्या बाबतीत असे काही घडत नाही. ते जेव्हा तोंड उघडतात तेव्हा त्यातून कडवट व हिंसेची भाषा बाहेर येते. आता बापूनी माध्यमांना शिव्या देत कुत्रे म्हटले आहे तर, परमेश्वर आपला यार असून, आपण त्याच्या मदतीने हवे ते घडवू शकतो, असा फालतू दावाही केला आहे.
महाराष्ट्रात आसाराम बापूला बंदी घातल्याने बापूनी येथून आपला मोर्चा शेजारील गुजरात राज्याकडे वळविला. सध्या ते सुरतमध्ये असून त्यांनी माध्यमांवक कडक शब्दात हल्ला केला. सामाजिक संस्थांना शिव्या घातल्या. कुत्रे भुंकत आहेत पण मी कोणाच्या बापाचे पाणी सांडत नसल्याचे सांगत सरकारलाही ठोकले.
आसाराम यांनी ही प्रतिक्रिया महाराष्ट्र सरकारने दिलेल्या सल्ल्याबाबत व माध्यमांत त्यांच्यावर झालेल्या टीकेबाबत होते. महाराष्ट्र सरकारने आसाराम यांना लोक पाण्यावाचून मरत असताना आपण होळी खेळू नये, असे सांगितले होते.
महाराष्ट्रासारखीच सध्या गुजरातमध्येही 9 जिल्ह्यात दुष्काळ आहे. तेथे लोक थेंब-थेंब पाण्यासाठी लढत आहेत. तेथील जमिनीवर आसाराम म्हणतात, बापू मूग दळत आहेत आणि कुत्रे भुंकत आहेत. मात्र परमेश्वर माझ्यासोबत असून, मी तर मनसोक्त रंग उडवणार. जेथे दुष्काळ आहे तेथे आम्ही पाऊस पाडतो. आम्ही परमेश्वराचे पाणी उडवितो. कारण तो आमचा यार आहे, असेही सांगत बापू मुक्ताफळे उधळतात. तसेच आपण काही दिवस एकंतवासात जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.