आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण साईच्‍या आश्रमात आढळले तळघर; आसाराम बापू गुजरात पोलिसांच्‍या ताब्‍यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद/इंदूर- आसाराम बापू आणि त्‍याचा मुलगा नारायण साई यांच्‍या अडचणी वाढतच आहेत. नारायण साईच्‍या गांभोई येथील महिला आश्रमात एक गुप्‍त तळघर सापडले असून तेथील भिंतींवर आश्रमाच्‍या मुली आणि नारायण साईंची छायाचित्रे चिपकवण्‍यात आलेली आहेत. त्‍यामुळे नारायण साईची आणखी काही प्रकरणे उघडकीस येण्‍याची शक्‍यता आहे. दरम्‍यान, आसाराम बापूचा ताबा गुजरात पोलिसांना देण्‍यात आला असून गांधीनगर येथील न्‍यायालयात त्‍यांची पत्‍नी लक्ष्‍मी आणि मुलगी भारती यांच्‍या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी होणार आहे. याशिवाय नारायण साईच्‍याही अटकपूर्व जामीनावर सुरत येथील न्‍यायालयात सुनावणी होणार आहे. नारायण साई अजुनही बेपत्ता आहे. त्‍याच्‍याविरुद्ध काही दिवसांपूर्वीच लुक आऊट नोटीस जारी करण्‍यात आलेली आहे.

उत्तर गुजरातमधील गांभोई येथे नारायण साईचा महिला आश्रम आहे. तेथे एक तळघर आढळून आले आहे. आश्रमात एक मारुतीचे मंदिर आहे. मंदिराखालीच हे तळघर आहे. तळघर खूप मोठे असून तेथे नारायण साई आणि आश्रमाच्‍या मुलींची छायाचित्रे चिपकविलेली आढळली. सुरत पोलिसांनी तळघराची तपासणी केली.

रावणाच्‍या जागेवर आसाराम... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये...