आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapu New Scandal Open By His Vaidya Doctor

आसारामबापू संताच्या वेशात जेथे पोहोचले, तेथे उभ्या केल्या संपत्तीच्या धनराशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आसाराम यांची मालमत्ता देशभर पसरली आहे. सत्संगाच्या निमित्ताने ते जिथे-जिथे गेले तेथे त्यांनी जमिनीचे व्यवहार केले. जेवढय़ा जमिनीची खरेदी केली, त्यापेक्षा दुप्पट त्यांनी बळावल्या. गेल्या 20 वर्षांत या सत्संगात जवळपास दीड हजार कोटी रुपयांच्या जमिनीचे ते मालक बनले. दिव्य मराठी नेटवर्कच्या वार्ताहरांनी देशभरातील आसाराम यांच्या जमीन व्यवहाराची माहिती जमा केली. यामध्ये 223 एकर जमीन एकतर त्यांच्या स्वत:च्या, ट्रस्टच्या किंवा निवटवर्तीयांच्या नावे आहे. मात्र, यापेक्षा दुप्पट म्हणजे जवळपास 588 एकर जमिनीवर त्यांचा किंवा निकटवर्तीयांचा ताबा आहे. अनेक ठिकाणच्या जागा व जमिनीची प्रकरणे जीवघेणी ठरली आहेत.

(खळबळजनक : 'महिलांना दुधातून कामोत्तेजक औषधे देऊन एकांतात भेटत होते आसाराम')


पुढील स्लाइडमध्ये, कुठे किती जमीन