आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘ती’ मुलगी मला नातीसारखी, वाईट वागलो नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर/अहमदाबाद- अल्पवयीन मुलीवरून टीकेचे लक्ष्य झालेले आसारामबापू यांनी आपल्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत, असे म्हटले आहे. ती मुलगी माझ्या नातीसारखी आहे. 15 ऑगस्टला तिच्यासोबत होतो, परंतु काहीही चुकीचे वागलो नाही. दोषी असेन तर आरोप सिद्ध करून दाखवा, अन्यथा गळाभेट घ्या, असे आसारामबापूंनी सांगितले.

पीडित मुलीची दिशाभूल केली जात आहे. तिची भाषा वकिलासारखी आहे. मेडिकल तपासातही आरोपांना पुष्टी मिळालेली नाही. आरोप असे आहेत, जे सिद्ध केले जाऊ शकत नाहीत. कधी ना कधी तरी ही मुलगी आपली चूक कबूल करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. काही दिवस तिहार तुरुंगात राहण्याचे ठरवले आहे. जेथे राहील ते माझ्यासाठी वैकुंठासमान असेल. नानकजीदेखील दोन वेळा तुरुंगात गेले होते. बुधवारी आसारामबापूंच्या प्रवक्त्याने वेगळे वक्तव्य केले होते. 15 ऑगस्टला ते जोधपूरमध्ये होते; परंतु मुलीसोबत नव्हते, असे प्रवक्त्याने म्हटले होते. दरम्यान, पीडितेचे नातेवाईक हल्ला होण्याच्या शक्यतेने भयभीत झाले आहेत. घटनेनंतर संपूर्ण कुटुंब भूमिगत झाले आहे.