आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधकांनी बुक केली विमान तिकिटे, आसारामना नेले कारने

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - सुरतच्या दोन सख्ख्या बहिणीतील एकीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या आसारामबापूंना मंगळवारी जोधपूरला नेण्यात आले. तेदेखील कारने. त्याच वेळी त्यांच्या साधकांनी मात्र जोधपूरसाठी सुमारे 100 विमान तिकिटे बुक करून ठेवली होती. आधी आसाराम यांना विमानाने जोधपूरला घेऊन जाण्याची योजना होती. साधकांच्या तयारीची माहिती मिळताच योजना बदलण्यात आली. आधी त्यांची रवानगी अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात करण्यात आली. पाच मिनिटे ठेवल्यानंतर जोधपूरला पाठवण्यात आले. तत्पूर्वी, पोलिस कोठडी पूर्ण झाल्याने मंगळवारी एसआयटीने त्यांना न्यायालयासमोर हजर केले. एसआयटीने कोठडी मागितली नसल्याने बापूंना तुरुंगात पाठवण्यात आले.