आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapu\'s Son Narayan Sai Gets Bail In Connection With Rape Case

नारायण साई अत्याचारानंतर तरुणीला म्हणायचा, \'आता मला न्हाऊ घाल\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- सुरतच्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम बापूचा मुलगा नारायण साई याला गुजरात उच्च न्यायालयाने तीन आठवड्यांचा सशर्त जामीन दिला आहे. गेल्या वर्षभरापासून नारायण साई तुरुंगात होता. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी आसाराम बापूही तुरुंगात आहे. या पार्श्वभूमिवर आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय पीडितेची आपबिती. जाणून घ्या काय सांगितले आहे तिने...
आजारी आई लक्ष्मीबेन हरपलानी हिला भेटायचे असल्याचे कारण सांगून नारायण साईने जामीन मिळण्याबाबत अर्ज सादर केला होता. लक्ष्मीबेन मणक्याच्या आजाराने आजारी असून तिच्यावर अहमदाबादच्या स्टेरलिंग हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करण्यात येणार आहे. नारायण साई डिसेंबर 2013 पासून सुरतच्या तुरुंगात होता.
जामीनाची तारीख 4 मे राहणार असून नारायण साई पोलिस निगराणीत राहणार असल्याचे न्यायाधीशांनी म्हटले आहे. गुजरातच्या डीजीपींनी नारायण साईवर नजर ठेवण्याची एका पोलिस अधिकाऱ्याला जबाबदारी द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
पुढील स्लाईडवर वाचा....नारायण साई अत्याचारानंतर तरुणीला म्हणायचा, 'आता मला न्हाऊ घाल'