आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रेय लाटण्याची घाई: नारायण साई दोन महिने फरार कसा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा/नवी दिल्ली/सुरत/भुवनेश्वर/मुंबई- अंतराळातील कॅमेरे सध्या कोणतेही जिवंत दृश्य कैद करतात. असे असताना नारायण साई पोलिसांना दोन महिने गुंगारा देत फिरत होता. अटकेचे र्शेय घेण्यासाठी पोलिस अधिकार्‍यांनी केलेली धडपड आणि साईची तंत्रज्ञानावर मात करण्याची कला याला जबाबदार ठरले.
साई दोन महिन्यांत 11 राज्यांमधील दोन डझन शहरांमध्ये फिरला. उत्तर प्रदेशच्या सीतापूरमध्ये आठवडाभर आणि उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये तो दहा दिवस होता. मात्र, पोलिसांना त्याची पुसटशीही कल्पना आली नाही. 17 ऑक्टोबर रोजी सुरत पोलिसांना मोबाइल निगराणीच्या माध्यमातून साई जयपूरमध्ये असल्याचे दिसून आला. मात्र, तोपर्यंत त्याने आपले ठिकाण बदलले होते. अखेर सुरत पोलिसांनी दिल्ली गुन्हे शाखेकडे मदत मागितली तेव्हा साई पंजाबहून दिल्लीला निघाला होता. तो ठाणे, बलसाडजवळच्या (गुजरात) वनात, राजस्थानमध्ये उदयपूर, पंजाबमध्ये लुधियाना, हरियाणातील रजोकरी, उत्तर प्रदेशातील आग्रा, नोएडा, ग्रेटर नोएडा आदी ठिकाणी थांबला होता.
सुरत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईजवळ 130 सिम आणि सहा मोबाइल सापडले. तो एक सिम पुन्हा वापरत नव्हता. आयआयएमआयई क्रमांकाच्या माध्यमातून मोबाइल फोन ट्रॅक झाला तरी सतत हॅँडसेट बदलत असल्यामुळे तो सापडत नव्हता. अखेर पोलिसांनी जुने हातखंडे वापरले. त्याच्या निकटवर्तीयांना पकडून ठावठिकाणा जाणून घेतला. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे तो पकडला. मात्र, त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाच्या र्मयादाही स्पष्ट झाल्या. साईच्या आधी त्याचे वडील आसाराम यांनीही अटकेआधी पोलिसांना गुंगारा दिला होता.