आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंदुरुस्त मुली हेरण्यासाठी आसाराम यांच्या आश्रमात होत होती रस्सीखेच स्पर्धा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - जोधपूर आश्रमात अल्पवयीन साधक विद्यार्थीनीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर सुरतच्या दोन बहीणींनी आसाराम यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. या दोन्ही आरोपात जोधपूर केद्रीय कारागृहात असलेले आसाराम यांना जामीन मिळणेही कठीण झाले आहे. त्यांचा मुलगा नारायण साईवरही बलात्काराचा आरोप असून तो फरार आहे. आसाराम यांच्या अटकेनंतर त्यांची अनेक प्रकरणे उघड होत आहेत.
सत्सगांत टॉर्चचा प्रकाश टाकून मुली हेरणारे आसाराम यांच्या मुली निवडण्याच्या आणखी एका पद्धतीचा खुलासा झाला आहे. दिवाळी साजरी करताना आसाराम एवढे क्रूर होत होते की, गाय आणि कुत्र्यांच्या शेपटीला फटाक्यांची माळ लावून त्या मुक्या प्राण्यांच्या फजितीचा हसत-हसत तमाशा पाहात असायचे. दिवाळीमध्ये त्यांचा आणखी एक आवडीचा खेळ होता. मुलींच्या रस्सीखेच स्पर्धेचा. याचा खुलासा त्यांचे पूर्वीचे साधक राहुल संचाण यांनी केला आहे.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, राहुल संचाण यांनी सांगितलेली आसाराम यांची मुली हेरण्याची पद्धत..