आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram \'s Political Connection Published In Hrishiprasad

अनेक पंतप्रधान होते आसारामचे भक्त, या नेत्यांना दाखवण्यात आले बापूंचे चेले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावनगरः आसाराम आश्रमाद्वारे प्रकाशित करण्यात येत असलेल्या नियतकालिकेमध्ये पंतप्रधान चंद्रशेखर, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, एच.डी. देवेगौडा य़ांच्या समवेत अनेक राजकीय नेत्यांचे फोटो प्रकाशित करण्यात आले आहेत. प्रकाशित करण्यात आलेल्या फोटोंमध्ये सर्वच नेते आसारामला नमस्कार करताना दिसत आहेत. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, राजस्थानचे मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया, स्व. गुलजारी लाल नंदा यांचा समावेश आहे. मागील ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या नियतकालिकेत आसाराम निर्दोष असल्याचे समर्थन करण्यासाठी पहिल्या पानावर हे सर्व फोटो प्रकाशित करण्यात आले आहेत. दरम्यान या नियतकालिकेच्या मुखपृष्ठावर छापण्यात आलेले हे सर्व राजकिय नेत्यांचे फोटो आसारामचे भक्त होते हे दर्शवतात.
नरेंद्र मोदी हे स्वतः आसाराम बापूंचे भक्त होते. 2003, 2004 आणि 2005 दरम्यान नरेंद्र मोदी आसारामच्या कार्यक्रमात उपस्थित राहात होते.
पुढील स्लाईडवर पाहा, या आसारामला नमस्कार करतानाचे नेत्यांचे फोटो...