आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ashrams Of Asaram Bapu In Various Places All Over The World

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्रीमंतांचे महालही थिटे पडतील असे आहेत आसाराम बापुंचे आश्रम, पाहा फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- आसाराम बापू आणि वादविवादांचे नाते जुनेच आहे. कोणता ना कोणता वाद सतत त्‍यांच्‍यासोबत जुळलेला असतो किंवा त्‍यांनाच वादांपासून दूर राहायचे नसते. सध्‍या त्‍यांच्‍यावर झालेल्‍या लैंगिक शोषणावरुन वाद सुरु आहे. एका अल्‍पवयीन मुलीने त्‍यांच्‍यावर आरोप केले आहेत. बलात्‍काराचा गुन्‍हाही आसाराम बापुंवर दाखल झाले आहेत.

यापूर्वीही आसाराम बापुंवर वेगवेगळे आरोप झाले आहेत. परंतु, त्‍यांना वादविवादांशी काहीही घेणेदेणे नाही. त्‍यांच्‍यावर त्‍याचा काहीही परिणाम होत नाही. टीकाकारांना ते भीक घालत नाहीत आणि कायद्याची त्‍यांना भीती नाही, असेही म्‍हणता येईल. जाणून घेऊ या आसाराम बापुंचा इतिहास आणि त्‍यांच्‍याशी संबंधीत असे वाद जे कायम चर्चेत राहिले.

आसाराम बापुंचा जन्‍म पाकिस्‍तानातील सिंध प्रांतात झाला.

नावः संत आसाराम बापू
जन्‍मदिन- 17 एप्रिल 1941
जन्‍मस्‍थळ- सिंध प्रांत
पिता- थौमल सिरुमलानी
माता- मेहनगिबा
पत्नी- लक्ष्‍मीदेवी
अपत्‍ये- नारायण प्रेम साई, भारती देवी

फाळणीच्‍या वेळेस आसाराम बापुंचे कुटुंब पाकिस्‍तानातून गुजरातमध्‍ये आले. सिंध प्रांतात बेरानी या गावात त्‍यांचा जन्‍म झाला. पिता कोळसा आणि लाकूड विकायचे. त्‍यांचे अडणाव हरपालानी असे होते. परंतु, ते बदलून त्‍यांनी बापू असे ठेवले. आज त्‍यांचे जगभरात 400 पेक्षा जास्‍त आश्रम आणि लाखो भक्त आहेत.

आसाराम बापुंचा अध्‍यात्‍माचा हा प्रवास 42 वर्षांपूर्वी सुरु झाला. तवेळी आसाराम हरपालानी यांना 10 एकर शेती मिळाली. त्‍यावर त्‍यांनी पहिला आश्रम सुरु केला. काही कालावधीनंतर त्‍यांनी अडणाव बदलले. आज लाखो भाविकांसाठी ते पूज्‍यनिय आहेत.

आसाराम बापुंच्‍या काही भव्‍य आश्रमांची झलक, पाहा पुढील स्‍लाईड्समध्‍ये...